राक्षीच्या संतोषची टी-२०  भारतीय संघात निवड

राक्षीच्या संतोषची टी-२० भारतीय संघात निवड

03095

राक्षीच्या संतोषची भारतीय संघात निवड
आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट स्पर्धा, ७ पासून श्रीलंकेत

सकाळ वृत्तसेवा

बोरपाडळे, ता. २ : राक्षी (ता. पन्हाळा) येथील आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेटपटू संतोष सर्जेराव रांजगणे यांची श्रीलंका संघाबरोबर होणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट सामन्यासाठी भारतीय संघात निवड झाली.
डिफेण्टली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया आयोजित नोएडा-उत्तरप्रदेश येथे भारत आणि श्रीलंका संघामध्ये टी-२० क्रिकेट ५ सामने होत आहेत. ७ ते १६ जूनअखेर दिव्यांगासाठी प्रथमच रात्रीच्या प्रकाशझोतात होणाऱ्या सामन्यात संतोष अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळत असून तो ६ व्या क्रमांकावर फलंदाजसाठी उतरणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील केवळ दोघांचा समावेश असून त्याच्याबरोबर कराड-सातारचा साहिल सय्यदही खेळणार आहे. डी.सी.सी.आय. म्हणजेच डिफेण्टली एबल्ड क्रिकेट कौन्सिलचे सचिव विक्रांत चौहान, भारतीय व्हीलचेअर क्रिकेटचे स्कॉडरनलीडर अभय प्रतापसिंह यांचे भारतीय संघामध्ये निवड झाल्याचे नुकतेच पत्र मिळाले आहे. २०१७ पासून त्यांनी १० आंतरराष्ट्रीय, २५ राष्ट्रीय तर आय.पी.एल. चे ७ सामने खेळले असून सदृढ लोकांनी खेळाकडे वळत तसेच दिव्यांग लोकांनी घरी न बसता खेळाच्या मदतीने, खेळाच्या माध्यमातून सशक्त आयुष्य घडवण्यासाठी प्रयत्नशील राहावे. वडिलांना अपघाताने अपंगत्व आले तरी त्यांनी क्रिकेटसाठी प्रोत्साहित केले आणि ग्रामस्थांचा पाठबळ असल्याचे रांजगणे यांनी सांगितले.

कोट -
माझे पती आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट खेळतात. दूरवरचा प्रवासाने कोल्हापूरचा नावलौकिक देशात करतात, याचा अभिमान वाटतो.
- प्राजक्ता रांजगणे.

कोट
- भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघ : सोमजित सिंग - कर्णधार, वीर संधू - उपकर्णधार, अनमोल वशिष्ठ, सौरभ मल्लिक, कबीर भदोरिया, उमेश कौपीकर, संतोष रांजगणे (अष्टपैलू), जयंत आल्ट, संदीप कुंडू, राजा बाबू, रोहित अनोग्रा, साहिल सय्यद, हरीशकुमार, सागर बी.आर., सुनिल राव, सुरेश एस., राखीव- प्रशांतकुमार, भीमा कुंती, कुबेरसिंग आणि व्यवस्थापक विश्वनाथ गुरव, कार्यकारी अधिकारी शिवप्रसाद.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com