बोरपाडळे हॉटेल फाटा येथील अपघातात दोघेजण जागीच ठार

बोरपाडळे हॉटेल फाटा येथील अपघातात दोघेजण जागीच ठार

03105, 03106
...
फोटो - 1 मारुती महाजन
2. सुगंधा महाजन
3. अपघातस्थळची वाहनांची झालेली अवस्था.
...
डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार दांपत्य ठार
बोरपाडळे फाटा चौकात अपघातः मृत जाधवाडीतील, मोटारीसह विजेच्या खांबाला धडक

बोरपाडळे -मलकापूर ता.८ : नियंत्रण सुटलेल्या भरधाव डंपरने रस्त्याकडेला उभारलेल्या दुचाकीला जोराची धडक देऊन फरपटत नेल्याने त्यावरील मूळचे जाधववाडी (ता. शाहूवाडी) येथील पती-पत्नी जागीच ठार झाले. हा डंपर पुढे रस्त्याकडेच्या मोटारीला धडक देत विद्युत खांबाला धडकून थांबला. मारुती रामचंद्र महाजन (वय ५७) व त्यांची पत्नी सुगंधा महाजन (वय ५० दोघेही रा. इचलकरंजी, मूळ गाव जाधववाडी ता. शाहूवाडी) असे अपघातात ठार झालेल्या दांपत्याची नावे आहेत. अंगाचा थरकाप उडवणारी ही भीषण दुर्घटना कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर पन्हाळा तालुक्यातील बोरपाडळे येथे नेहमी गजबजलेल्या भर चौकात आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त डंपरवरील चालक विनोद विश्वनाथ सोनवणे (रा. कवठा, ता. उमरगा, जि. धाराशिव) याला कोडोली पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्यावर रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
याबाबत घटनास्थळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, आज सकाळी अकरा वाजता बोरपाडळे चौक नेहमीप्रमाणे वाहतूक व नागरिकांनी गजबजलेला होता. आंबवडे घाटातून भरधाव वेगाने आलेल्या डंपरचे (एम एच.११.सी.एच. ६६१७) बोरपाडळे चौकात आल्यानंतर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यावेळी त्याने रस्त्याकडेला उभारलेल्या दुचाकीला (एम एच. ०९ ई क्यू २८०७) जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरील मारुती रामचंद्र महाजन व त्यांची पत्नी सुगंधा यांना सुमारे वीस फूट फरपटत नेले. त्यानंतर तो डंपर पुढे जाऊन रस्त्याकडेला उभारलेल्या मोटारीला जोरात धडकला. दुर्घटनाग्रस्त डंपर हा पुढे रस्त्याकडेच्या विजेच्या खांबाला जाऊन आदळल्याने खांब मोडून पडला, तेथेच डंपर थांबला.
या घटनेमुळे परिसरात एकच हाहाकार उडाला. अपघाताची माहिती मिळताच कोडोली पोलिस ठाण्यातील भैरू माने, सागर कुंभार, तसेच महामार्ग पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतुकीची कोंडी दूर केली.
...
गावाहून इचलकरंजीला जाताना काळाचा घाला
मारुती महाजन व त्यांची पत्नी सुगंधा हे दांपत्य गेली काही वर्षे दोन मुलांसह नोकरीनिमित्त इचलकरंजी येथे स्थायिक झाले आहेत. दहा दिवसांपूर्वी शेती व घरगुती कामानिमित्त ते मूळ गावी जाधववाडी (ता. शाहूवाडी) येथे आले होते. शेतीची कामे अटोपून आज सकाळी ते आपल्या दुचाकीवरून इचलकरंजीला जात होते. काही मिनिटे बोरपाडळे चौकात रस्त्याकडेला थांबले असताना डंपररूपी आलेल्या काळाने त्यांच्यावर घाला घातला. महाजन यांच्या मागे आई, दोन विवाहित मुले, सुना, एक भाऊ असा परिवार आहे. दोघांच्याही मृतदेहांवर जाधववाडी येथे सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
...
हॉटेलमध्ये गेले म्हणून बचावले
या दुर्घटनेत डंपरने धडक दिलेल्या थांबलेल्या मोटारीचा चक्काचूर झाला. सुदैवाने त्या मोटारीतील पाच प्रवासी मोटार रस्त्याकडेला उभी करून नुकतेच शेजारील हॉटेलमध्ये नाष्टा करण्यासाठी गेले होते. तोपर्यंत ही दुर्घटना घडली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com