राक्षीचा संतोष रांजगणे सिनिअर् नॅशनल व्हीलचेअरला खेळणार

राक्षीचा संतोष रांजगणे सिनिअर् नॅशनल व्हीलचेअरला खेळणार
Published on

3338
संतोष रांजगणे
....
संतोष रांजगणे
राज्याच्या संघात
बोरपाडळे : राक्षी (ता. पन्हाळा) येथील आंतरराष्ट्रीय व्हीलचेअर क्रिकेट खेळाडू संतोष रांजगणे यांची महाराष्ट्र संघामध्ये राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. मध्य प्रदेशातील माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी दिव्यांग खेळ प्रशिक्षण केंद्र, ग्वाल्हेर येथे सहावी सीनिअर नॅशनल व्हीलचेअर रग्बी पॅराचॅम्पियनशिप स्पर्धा होत आहेत. या स्पर्धेत देशातील सुमारे १५ राज्यांचे संघ खेळणार आहेत. ही स्पर्धा १ व २ ऑक्टोबर रोजी होणार आहे. महाराष्ट्र संघामध्ये मुंबईचे भावेश त्रिवेदी कर्णधार आहेत. याशिवाय मुंबईचे अतुल वधाने, ॲग्नल नायडू, पुण्याचे लक्ष्मण दळवी व सचिन पडवळ आणि कोल्हापूरच्या संतोष रांजगणे यांचा समावेश झाला आहे. महाराष्ट्राच्या संघासाठी लुईस जॉर्ज प्रशिक्षक असून, महाराष्ट्र संघातील निवडीचे व्हीलचेअर रग्बी फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव निखिल गुप्ता यांचे पत्र मिळाल्याचे संतोष यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com