Tue, Feb 7, 2023

राशिवडेत अंगणवाडी मुलांच्याकडून सावित्रीबाई फुले जयंती
राशिवडेत अंगणवाडी मुलांच्याकडून सावित्रीबाई फुले जयंती
Published on : 3 January 2023, 1:40 am
02089
राशिवडे बुद्रुक सावित्रीबाई फुले जयंती
राशिवडे बुद्रुक ः येथील अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना निसर्गभ्रमंतीसाठी बिरदेव मंदिराच्या टेकडीवर सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली. बालचमूनी निसर्ग सहलीचा आनंद घेत भोजनाचा आनंदही घेतला. अंगणवाडी क्र. ११६ मधील मनीषा कुलकर्णी, धनलक्ष्मी तवटे यांनी मदतनिसांना आणि विद्यार्थ्यांना एकत्र करून बिरदेव मंदिराजवळ नेले. विद्यार्थ्यांना महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा करून सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. त्यानंतर बालगीते गावून मुलांनी आनंद घेतला. निसर्गाच्या सान्निध्यात घरातून आणलेले जेवण केले. यांना पूनम पवार, वृषाली जोंग, निशिगंधा कानकेकर व पालकांनीही सहकार्य केले. बालचमूंना सावित्रीबाईंविषयी माहिती दिली.