Wed, Feb 8, 2023

पुंगाव उपसरपंच पदी दशरथ भिवसेकर बिनविरोध
पुंगाव उपसरपंच पदी दशरथ भिवसेकर बिनविरोध
Published on : 20 January 2023, 3:53 am
02104
पुंगाव उपसरपंचपदी दशरथ भिवसेकर
राशिवडे बुद्रुक ः पुंगाव (ता. राधानगरी) उपसरपंचपदी दशरथ सदाशिव भिवसेकर यांची बिनविरोध निवड झाली. सुरेश चव्हाण निवडणूक अधिकारी होते. सरपंच संजुताई पाटील यांच्यासह नूतन उपसरपंच भिवसेकर व सदस्यांचा सत्कार झाला. यावेळी मनीषा पाटील, चंद्रकला पाटील, शारदा भांदिगरे, राजश्री कुलकर्णी, संगीता कांबळे, दत्तात्रय पाटील, अशोक भांदिगरे, रघुनाथ धनवडे या नूतन सदस्यांसह माजी सरपंच विठ्ठल पाटील, संतोष कांबळे, माजी उपसरपंच राजेश्री पाटील, वसंत नारकर, श्रीकांत कुलकर्णी, लक्ष्मण कुलकर्णी, लक्ष्मण पाटील, भिकाजी बरगे उपस्थित होते. ग्रामसेविका सुजाता सोनवणे यांनी स्वागत, संजय पाटील यांनी आभार मानले.