
आदमापूर बाळूमामा मंदीरातील खोबरेल तेल निर्मिती फोटो स्टोरीसाठी
आदमापुरातील नारळापासून तेलनिर्मिती
आदमापूर येथे संत बाळूमामांच्या दर्शनासाठी महाराष्ट्र, कर्नाटकासह अन्य राज्यांतूनही भाविकांची रोज गर्दी होते. अमावास्येला येथे मोठी यात्राच भरते. लाखोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांकडून बाळूमामांच्या चरणी नारळ फोडले जातात. त्यातील एक भाग भाविकांना प्रसाद म्हणून दिला जातो आणि एक भाग भाविक देवाला अर्पण करतात. अशी नारळांची भकलं मोठ्या प्रमाणात जमा होतात. मंदिर प्रशासन या खोबऱ्यापासून तेलनिर्मिती करते आणि येणाऱ्या भाविकांना स्वस्त दरात त्याची विक्री केली जाते. फोडलेला नारळ ते त्यापासून तयार होणारे तेल याचा हा चित्रमय प्रवास.
(राजू कुलकर्णी : सकाळ छायाचित्रसेवा)
02197
अमावास्येला भाविक नारळ अर्पण करतात.
02198
फोडलेल्या ओल्या खोबऱ्याची भकलं अशी वाळवत ठेवली जातात.
02199
वाळलेली भकलं एकत्रीत केली जातात.
02200
वाळलेल्या भकलातील खोबरे वेगळे करण्यासाठी सेवाभावी वृत्तीने भाविक काम करतात.
02201
काढलेले खोबऱ्याचे तुकडे पुन्हा वाळवत ठेवले जातात.
02202
मडिलगे येथील तेल घाण्यावर स्वच्छ तेलनिर्मिती केली जाते.
02203
काढलेले तेल तीन मोठ्या पातेल्यांत फिल्टरसाठी ठेवले जाते.
02205
फिल्टर केलेले स्वच्छ खोबरेल तेल कॅनमध्ये भरून आदमापूर येथील मंदिरात पाठवले जाते.
02209
बाळूमामांच्या दर्शनाला आलेले भाविक प्रसाद म्हणून तेलाची खरेदी करतात.