सेवानिवृत्त जवानाची शिरगावात मिरवणूक व सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सेवानिवृत्त जवानाची शिरगावात मिरवणूक व सत्कार
सेवानिवृत्त जवानाची शिरगावात मिरवणूक व सत्कार

सेवानिवृत्त जवानाची शिरगावात मिरवणूक व सत्कार

sakal_logo
By

02151

जवान संजय कलिकते यांचा सत्कार
शिरगाव ः देशरक्षणासाठी देशसेवेचं व्रत घेत २१ वर्षे देशासाठी लढणाऱ्या शिरगाव (ता. राधानगरी) येथील जवान संजय पांडुरंग कलिकते याची ग्रामस्थांनी मिरवणूक काढून नागरी सत्कार केला. संजय १०९ टीए मराठा बटालियन सैन्यदलात हवालदारपदी कार्यरत होते. ते सेवेतून निवृत्त झाल्यानंतर फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांची मिरवणूक काढली. अध्यक्षस्थानी निवृत्त मेजर सागर चौगले होते. ग्रामपंचायत, विश्‍वसागर अकॅडमी, गोपाळबुवा व्यापारी मंडळ व ग्रामस्थांतर्फे सत्कार झाला. सत्काराला उत्तर देताना संजय कलिकते म्हणाले, ‘शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांनी देशसेवेसाठी पुढे यावे. आई, वडील, गाव, देश यांना विसरू नका.’ सरपंच संदीप पाटील यांच्या हस्ते कलिकतेंचा सत्कार झाला. उपसरपंच संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. विनायक व्हरकट, सागर गुरव, डी. एस. पाटील, सुरेश पाटील, राजेंद्र जाधव, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष पंडित कलिकते, उपाध्यक्ष अशोक भोईटे, अंकुश गुरव, महादेव जाधव, सुरेश पोवार, पांडुरंग लोटेकर, ग्रामस्थ उपस्थित होते. विष्णू कलिकते यांनी आभार मानले.