मोफत शैक्षणिक साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोफत शैक्षणिक साहित्य वाटप
मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

मोफत शैक्षणिक साहित्य वाटप

sakal_logo
By

२१६२
पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे
मोफत शैक्षणिक साहित्य
शिरगाव, ता. २१ ः सामाजिक कार्यात अग्रभागी राहून कंथेवाडीतील माजी आमदार कै. शंकर धोंडी पाटील चॅरिटेबल ट्रस्टने आदर्श निर्माण केला आहे. त्यांचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन कोजिमाशि बॅंकेचे माजी संचालक बाळासाहेब पोवार यांनी केले. आवळी खुर्दला आवळी व तरसंबळेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना कै. शंकर धोंडी पाटील चॅरिटेबल ट्रस्टतर्फे मोफत शैक्षणिक साहित्य वाटपावेळी ते बोलत होते. माजी सरपंच दत्तात्रय पाटील अध्यक्षस्थानी होते. ट्रस्टचे अध्यक्ष वसंतराव पाटील, माजी सभापती वंदना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. माजी सरपंच सर्जेराव बुगडे स्वागत, मुख्याध्यापक राजेंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले. शंकरराव पाटील यांच्या कार्याचा वसा घेवून पुढे जाऊ, असे वसंतराव पाटील यांनी सांगितले. शिक्षक नेते जोतिराम पाटील, एम. डी. पाटील, तांबेकर, राजाराम पाटील, अभिजित पाटील, श्रध्दा पाटील, रघुनाथ बुगडे, तानाजी डवर, प्रदीप पाटील, श्रीकांत साळोखे, सरपंच जया पाटील, उपसरपंच, ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते. कृष्णात ह्राटवळ यांनी आभार मानले.