
टू ४
02307
राशिवडे बुद्रुकला स्वामी समर्थ, गोरोबाकाका पुण्यतिथी
राशिवडे बुद्रुक ः श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ..च्या गजरात आणि पुंडलिक वरदा हरी विठ्ठल...च्या नामघोषात पुंगाव (ता. राधानगरी) येथे स्वामी समर्थ व संत शिरोमणी गोरोबा कुंभार यांची पुण्यतिथी झाली. येथे श्री स्वामी समर्थ भक्त मंडळातर्फे ग्रामदैवत लक्ष्मी नारायण मंदिरात स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त सकाळी प्रतिमापूजन, संगीत भजन झाले. महाआरतीनंतर पुष्पवृष्टी झाली. यावेळी भाविकांना खिरीचा प्रसाद वाटप झाले. यावेळी ओंकार कुलकर्णी, मनीष गुळवणी, अनंत बरगे, ओंकार बरगेंसह कार्यकर्ते सहभागी होते. संत गोरोबा काका कुंभार समाज मंडळातर्फे संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी झाली. भगवान कुंभार दांपत्याच्या हस्ते गोरोबा काका प्रतिमेचे पूजन झाले. कुंभार समाजातील महिलांनी महाआरतीत सहभाग घेतला. यावेळी बळवंत कुंभार, आनंदा कुंभार, दत्तात्रय कुंभार, रामचंद्र कुंभार, दिनकर कुंभार, महादेव कुंबार, संदीप कुंभार, संभाजी कुंभार, जोतिराम कुंभार, रामचंद्र साळवी आदींसह कुंभारबांधव उपस्थित होते.