अर्धवेळ शिक्षकांनी दिले आमदार म्हात्रे यांना निवेदन

अर्धवेळ शिक्षकांनी दिले आमदार म्हात्रे यांना निवेदन

Published on

02462

शिक्षक आमदार ज्ञानेश्‍वर म्हात्रे
यांना विविध मागण्यांचे निवेदन

शिरगाव, ता. ८ : अर्धवेळ शिक्षकांना दिवाळीपर्यंत पूर्णवेळ शिक्षक म्हणून मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही कोकणचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी जिल्हा दौऱ्यावर आलेल्या भेटीप्रसंगी ते जिल्हा मुख्याध्यापक संघात सहविचार सभेत बोलत होते. शिक्षक नेते दादासाहेब लाड, विनाअनुदान कृती समितीचे नेते खंडेराव जगदाळे, बी. जी. बोराटे, मुख्याध्यापक आर. वाय. पाटील, बाबासो पाटील, अनिल चव्हाण, राजेश पाटील, दत्तात्रय पाटील, जे. बी. पाटील, जिल्हा संस्थाचालक संघाचे सचिव एम. एन. पाटील उपस्थित होते.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघटनांतर्फे आमदार म्हात्रेंचा सत्कार झाला. आमदार म्हात्रे म्हणाले, ‘जुनी पेन्शन योजना, सेवा संरक्षण, वीस, चाळीस, साठ टक्के अनुदान असलेल्या शाळांना वाढीव अनुदान, अर्धवेळ शिक्षकांचे पूर्णवेळ शिक्षक म्हणून उन्नयन, खासगी प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांच्या संचमान्यतेत मुख्याध्यापक पदे मंजूर करणे, संचमान्यतेतील त्रुटी दूर करणे आदी प्रश्न निकालात काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. खंडेराव जगदाळे, दादासाहेब लाड यांनी मनोगत व्यक्त केली. सचिव पुंडलिक खराडे ,राजेंद्र कोरे, संभाजी पोवार, एस. टी. हाळवणकर, प्रमोद कांबळे, केरबा जाधव, डी. जी. पाटील, मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. चेअरमन सुरेश संकपाळ यांनी स्वागत, विजय पाटील यांनी प्रास्ताविक तर दीपक पाटील यांनी आभार मानले.

02462
कोल्हापूर : येथे ज्ञानेश्वर म्हात्रे यांना निवेदन देताना दादासाहेब लाड व मान्यवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.