राज्यपुष्प ‘ताह्मण’ बहरले

राज्यपुष्प ‘ताह्मण’ बहरले

3335
राधानगरी ः गुलाबी, जांभळ्या रंगाने बहरलेला हा वृक्ष ताह्मण या नावाने ओळखला जातो. याला जारूळ असेही म्हणतात. सध्या ताह्मण वृक्ष फुलांनी बहरून गेले आहेत. महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणून याची ओळख आहे. राधानगरी येथे घेतलेले छायाचित्रय (राजू कुलकर्णी ः सकाळ छायाचित्रसेवा)
..............
राज्यपुष्प ‘ताह्मण’ बहरले

सकाळ वृत्तसेवा
शिरगाव, ता. ९ ः राधानगरी येथे सध्या जांभळ्या, गुलाबी, फिकट गुलाबी अशा रंगांच्या फुलांचे ताटवे बहराला आले असून, नाजूक मुलायम असलेल्या या फुलांचा बहर सध्या लक्ष वेधून घेत आहे. या फुलांचे नाव आहे ताह्मण. साधारणतः मे महिन्यात म्हणजेच एक मेपासून या फुलांना बहर चढतो. महाराष्ट्र दिनाच्या काळातच फुलांच्या बहराला सुरुवात होत असल्याने याला महाराष्ट्राचे राज्यपुष्प म्हणूनही ओळखले जाते.
मेंदीच्या कुळातील ताह्मण किंवा तामन हा वृक्ष मध्यम आकाराचा असल्याचे पाहायला मिळते. कोकणात नदीनाल्यांच्या काठाने तो अधिक प्रमाणात आढळतो. भरपूर पाणी असणाऱ्या ठिकाणी ताह्मण वृक्ष पाहायला मिळतात. या वृक्षाला ‘मोठा बोंडारा’ असेही म्हणतात. हा पानगळीचा वृक्ष असल्याने फेब्रुवारी, मार्चमध्ये याची पानगळ होते. मेपासून फुले यायला सुरुवात होते. कधी कधी फुलोरा आणि पालवी एकदमच येते. याची फुले खालून वर टोकाकडे उमलत जातात. फांद्यांच्या टोकाला फुलोरा असतो. झालर लावल्याचा भास होतो. फूल दिसायला सुंदर असल्याने त्याला ‘महाराष्ट्राचे राज्यपुष्प’ असा मान मिळाला आहे. फुलांचा बहर उन्हाळ्यात सुरू होतो. तो दोन ते तीन महिने टिकतो. वर्षातून दोनदा बहर यतो. एप्रिल ते जूनच्या रखरखत्या उन्हातही हा फुलोरा लक्ष वेधून घेतो.
..............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com