नैसर्गिक शेतीतून निरोगी आरोग्य

नैसर्गिक शेतीतून निरोगी आरोग्य

Published on

3555
शिरगाव ः सध्या नैसर्गिक शेती काळाची गरज बनली असली तरी मशागतीच्या सुरुवातीपासूनच औषधांची फवारणी सुरू असते.
...
नैसर्गिक शेतीतून निरोगी आरोग्य

रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत ढोसळतोय

सकाळ वृत्तसवा
शिरगाव, ता. ५ ः अन्न, वस्र आणि निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. यासाठी बळीराजा अन्नधान्याची निर्मिती करतो, पण अलीकडे कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवण्याच्या हव्यासापायी रासायनिक खतांचा आणि औषधांचा वापर वाढल्याने जमिनीची सुपीकता ढासळू लागली असून, तिचे आयुष्यमान घटत चालले आहे. यासाठी शक्य होईल तेवढी नैसर्गिक शेती करून जमिनीचे आणि आपले आरोग्य जपले पाहिजे.
वाढती लोकसंख्या पाहता अन्नाची गरज भागविण्यासाठी कमी काळात आणि कमी श्रमात जास्त उत्पादन मिळविण्यासाठी बागायती आणि जिरायती जमिनीवर रासायनिक खते, विषारी बुरशीनाशक कीटकनाशके, कीटक आणि कीडनाशके, तणनाशके आदी औषधांचे जमिनीवर अतिक्रमणच होत चालले आहे. यामुळे जमिनीचा पोत बिघडून जमिनीचे आयुष्य घटत चालले आहे. याचा आरोग्यावरही परिणाम जाणवू लागला आहे. माणसांमध्येही विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे.
कृषी क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. पूर्वी शेतकरी आपल्या घराच्या मागे किंवा पडसर जागेत जनावरांचे शेण, मूत्र आणि वाया गेलेली वैरण एका मोठ्या खड्ड्यात कुजवत असत. त्याचे शेणखतात रूपांतर झाले की, तेच खत वापरून सेंद्रीय, नैसर्गिक शेती करत होते. यामधून माणसाचे आरोग्य जपले जायचे. अलीकडे बियांच्या पेरणीपासूनच औषधांची फवारणी सुरू होते आणि रासायनिक खतांचा प्रचंड मारा केला जातो, यामुळे अन्नधान्यातील कस निघून गेला असून, विविध आजाराना आमंत्रण दिले जात आहे. लहान वायात चष्मा लागणे, हृदयविकार, अकाली केस पांढरे होणे, ब्लडप्रेशर, मधुमेह आदी आजारांनी शिरकाव केला आहे. अकाली होणारे आजार थांबविण्यासाठी शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेतीकडे लक्ष घातले पाहिजे.
.........................
कोट...
सेंद्रीय शेतीसाठी गावपातळीवर असणाऱ्या कृषी सहायकांमार्फत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती अभियानाचा लाभ शेतकऱ्यानी घ्यावा. शेतकऱ्यांसह नोकदारांनीही यामध्ये सहभागी व्हावे. एक रुपया भरून १५ जुलै २०२४ पर्यंत पीक विमा उतरवावा. यासाठी कृषी सहायक, पर्यक्षक किंवा कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करावा.
श्रुतिका नलवडे, प्रभारी कृषी अधिकारी, राधानगरी तालुका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.