
स्वाभिमानीचे तहसिलदारांना निवेदन
फोटो chd४१.jpg
02325
चंदगड ः अव्वल कारकून विलास पाटील यांना निवेदन देताना प्रा. दीपक पाटील व कार्यकर्ते.
-----------------------------------
कारखानदार, ऊस उत्पादकांची बैठक बोलवा
स्वाभिमानीची मागणी; चंदगड तालुक्यात स्थानिक उसाला उठाव नसल्याची तक्रार
चंदगड, ता. ४ ः तालुक्यात दरवर्षीच्या सरासरीनुसार आत्तापर्यंत पन्नास टक्के उसाची तोड होणे आवश्यक होते; परंतु कारखानदारांनी स्थानिक उसाला डावलून कार्यक्षेत्राबाहेरील उसाला प्राधान्य दिल्याने परीस्थिती गंभीर झाली आहे. यासंदर्भात दौलत-अथर्व, इको केन आणि ओलम शुगर कारखान्याचे अधिकारी व स्थानिक ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संयुक्त बैठक बोलवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. यासंदर्भात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे.
प्रत्येक कारखान्याचे आत्तापर्यंत झालेले गाळप, त्यामध्ये तालुक्यातील किती ऊस गाळप केला, कारखान्याकडे करार झालेल्या टोळ्यांची संख्या, त्यामध्ये स्थानिक व बीडच्या टोळ्यांची संख्या किती, गावनिहाय ऊसतोड करणाऱ्या टोळ्यांची संख्या, कर्नाटकमध्ये ऊसतोड करणाऱ्या टोळ्यांची संख्या, चंदगड तालुक्याव्यतिरीक्त इतर तालुक्यांत असणाऱ्या टोळ्यांची संख्या, तालुक्यातील ऊस तोडीबाबत कारखान्यांचे धोरण काय असणार याची माहिती येताना घेऊन यावी, अशी मागणी केली आहे. मंगळवारी (ता. १०) या संयुक्त बैठकीचे आयोजन करावे, अशी मागणी केली आहे. निवेदनावर संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दीपक पाटील, अजित पाटील, विरुपाक्ष कुंभार, अर्जून मर्णहोळकर, पुंडलिक पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.