आरोग्य विभागाकडून जनतेचा विश्वास संपादन

आरोग्य विभागाकडून जनतेचा विश्वास संपादन

Published on

02383
चंदगड : आरोग्य अभियानाचे उद्‍घाटन आमदार राजेश पाटील यांनी दीपप्रज्वलनाने केले. प्राची काणेकर, डॉ. बी. डी. सोमजाळ आदी उपस्थित होते.
-----------------------------------------
आरोग्य विभागाकडून जनतेचा विश्वास संपादन
आमदार राजेश पाटील; चंदगडला जागृत पालक सुदृढ बालक अभियानाचे उद्‍घाटन
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ९ : चंदगड आरोग्य विभागाने कोरोनात कमी मनुष्यबळ असतानाही उत्कृष्ट काम करून जनतेचा विश्वास संपादन केला. शासनाच्या विविध योजना या विभागाकडून चांगल्या प्रकारे राबवल्या जातात, असे मत आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केले. येथील ग्रामीण रुग्णालयात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना व जागृत पालक सदृढ बालक अभियानाच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. नगराध्यक्षा प्राची काणेकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गायकवाड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ, डॉ. एस. एस. साने, डॉ. गजेंद्र पाटील प्रमुख उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘‘तालुक्यात उपजिल्हा रुग्णालयाच्या कामास लवकरच सुरुवात होत आहे. चंदगड ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढवण्यासाठीही प्रयत्न आहेत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जागरुक पालक सुदृढ बालक या अभियानांचा लाभ तालुक्यातील जनतेने घ्यावा.’’
वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन गायकवाड यांनी स्वागत केले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. डी. सोमजाळ यांनी प्रास्ताविक केले. येत्या दोन महिन्यांत तालुक्यातील सर्व बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार असल्याचे सांगितले. शासनाच्या आरोग्यविषयक विविध योजनांची माहिती दिली. स्वराज्य मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल गडहिंग्लजच्या वतीने रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. समुपदेशक विनायक देसाई यांनी सूत्रसंचालन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.