
बागिलगे विद्यालयातून साहित्य रवाना
02385
डुक्करवाडी : बागिलगे डुक्करवाडी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी साहित्य जमा केले.
------------------------------------
बागिलगे विद्यालयातून साहित्य रवाना
चंदगड : डुक्करवाडी (ता. चंदगड) येथील बागिलगे डुक्करवाडी विद्यालयातून कणेरी मठ येथे होणाऱ्या पंचमहाभूत लोकमहोत्सवासाठी साहित्य पाठवले. साड्या, प्लास्टिक पिशव्या, वाट्या, ग्लास, तांबे, ताट, प्लेट आणि तूरडाळ असे साहित्य पाठवले. माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार हा उपक्रम राबवला. विद्यार्थ्यांनी घरातील प्लास्टिक व देण्याजोगे प्रापंचिक साहित्य जमा केले. उपक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक एस. एस. तुर्केवाडकर, एम. एन. शिवनगेकर, ए. बी. नाईकवाडी, पी. एस. मगदूम, आर. जी. शिवनगेकर, टी. व्ही. पाटील, के. टी. चिंचणगी, एस. जी. पाटील, व्ही. एन. मुंगारे, जे. एम. मजुकर आदींनी परिश्रम घेतले.