शिक्षकांनी अध्यापन कला आत्मसात करावी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांनी अध्यापन कला आत्मसात करावी
शिक्षकांनी अध्यापन कला आत्मसात करावी

शिक्षकांनी अध्यापन कला आत्मसात करावी

sakal_logo
By

02408
हलकर्णी ः डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे स्वागत करताना गोपाळराव पाटील. शेजारी अशोक जाधव, विशाल पाटील आदी.
-----------------------------------------
शिक्षकांनी अध्यापन कला आत्मसात करावी
डॉ. हिर्डेकर; हलकर्णी महाविद्यालयात भाषा अध्यापन विषयावर चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १९ ः अध्ययन- अध्यापनातून विद्यार्थी घडत असतात. अध्यापन ही एक कला असून शिक्षकांनी ती आत्मसात केल्यास त्याचे अधिक चांगले परीणाम दिसून येतात, असे मत डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी व्यक्त केले.
हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण पाटील महाविद्यालयात ‘माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील भाषांचे अध्याप’ या विषयावर राज्यस्तरीय चर्चासत्र झाले. त्यावेळी डॉ. हिर्डेकर बीजभाषक म्हणून बोलत होते. संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील अध्यक्षस्थानी होते.
गोपाळराव पाटील म्हणाले, `भाषेमुळे परीसराची संस्कृती माहित होते. भाषेची व्याप्ती वाढवण्यासाठी संभाषणवृत्ती महत्वाची आहे.` डॉ. अरुण शिंदे यांनी मराठी विषयावर, डॉ. अर्जून चव्हाण यांनी हिंदी तर डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी इंग्रजी विषयावर मार्गदर्शन केले. शेवटच्या सत्रात खुली चर्चा झाली. प्रा. डॉ. आय. आर. जरळी व प्रा. एस. एन. खरुजकर यांनी संयोजन केले. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, डॉ. राजेश घोरपडे, अधिक्षक प्रशांत शेंडे आदी उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव यांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून चर्चासत्राचे उद्‍घाटन झाले. मराठी व इंग्रजी विषयांच्या भित्तीपत्रकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले. डॉ. चंद्रकांत पोतदार यांच्या अक्षरलिपी ग्रंथाचे प्रकाशन झाले. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. पी. ए. पाटील यांनी स्वागत केले. प्रा. डॉ. अनिल गवळी यांनी पाहुण्यांचा परीचय करुन दिला. डॉ. पोतदार व प्रा. व्ही. व्ही. कोलकार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. यु. एस. पाटील यांनी आभार मानले.