चंदगडी बोलीमध्ये संस्कृतीच संचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चंदगडी बोलीमध्ये संस्कृतीच संचित
चंदगडी बोलीमध्ये संस्कृतीच संचित

चंदगडी बोलीमध्ये संस्कृतीच संचित

sakal_logo
By

02424
मौजे कारवे ः सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेत बोलताना प्रा. डॉ. गोपाळ गावडे.
-------------------------------------
चंदगडी बोलीमध्ये संस्कृतीच संचित
डॉ. गोपाळ गावडे; सरस्वती वाचनालयाच्या व्याख्यानमालेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २३ ः चंदगडी बोलीमध्ये विशिष्ट प्रकारची गोडी आहे. या भाषेतील गाणी, ओव्या यातून येथील संस्कृतीच संचित सामावल्याचे मत प्रा. डॉ. गोपाळ गावडे यांनी व्यक्त केले. मौजे कारवे (ता. चंदगड) येथील सरस्वती व्याख्यानमालेत ते बोलत होते. बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या तुर्केवाडी शाखेचे व्यवस्थापक राजीव कांबळे अध्यक्षस्थानी होते.
डॉ. प्रकाश दुकळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. गावडे म्हणाले, ‘आपल्या बोलीभाषेतूनच मुक्त संवाद साधता येतो. आपली भाषा जोपासण्यासाठी किमान त्या भागातील लोकांनी संवाद साधताना बोलीभाषेचा उपयोग करायला हवा.’ तीन दिवसांच्या व्याख्यानमालेत डॉ. टी. ए. कांबळे यांनी पहिल्या दिवशी तर महादेव शिवणगेकर यांनी दुसऱ्या दिवशी मनोगत मांडले. कांबळे यांनी जातीव्यवस्थेची केंद्रे नष्ट व्हायला हवीत, असे सांगितले. शिवणगेकर यांनी वाचन संस्कृतीचे महत्व पटवून दिले. विविध क्षेत्रात यश मिळवलेल्या व्यक्तींचा सत्कार झाला. त्यामध्ये डॉ. प्रकाश दुकळे, अॅड. कार्तिक पाटील, सौ. सीमा नांदवडेकर, गणपती पवार, व्यंकू नाईक, संकेत चांदीलकर, आनंद सुतार यांचा समावेश होता. सरपंच जोतिबा आपके, एम. एम. तुपारे, सूर्याजी ओऊळकर, विष्णू कार्वेकर, नारायण पाटील, काजमिल फर्नांडीस उपस्थित होते. जॉनी फर्नांडीस, हेमिल फर्नांडीस, चंदा कांबळे, सुरेश कांबळे यांनी संयोजन केले. अॅड. कार्तिक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.