अपघातात एक ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अपघातात एक ठार
अपघातात एक ठार

अपघातात एक ठार

sakal_logo
By

८८८६८
तिलारी घाट ः येथे रविवारी दरीत कोसळलेली क्रेन.
02501
मृत जावेद अत्तार

तिलारी दरीत क्रेन कोसळून
बेळगावचा तरुण ठार
---
चालक बचावला; अपघातग्रस्त वाहने बाहेर काढताना दुर्घटना
चंदगड, ता. १३ ः तिलारी (ता. चंदगड) घाटात कोदाळी गावानजीक दरीत पडलेली मोटार काढत असताना क्रेनचालकाचा ताबा सुटून क्रेनमध्ये बसलेला तरुण खाली पडला. त्याच्या अंगावर क्रेन पडल्याने तो ठार झाला. जावेद इब्राहिम अत्तार (रा. आझादनगर, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. या अपघातात क्रेनचालक अर्शफ कयामत अन्सारी (मूळ रा. मलहाना, उत्तर प्रदेश, सध्या रा. आझादनगर, बेळगाव) जखमी झाला. काल (ता. १२) सायंकाळी सहाच्या सुमारास हा अपघात झाला.
तिलारी घाटात शुक्रवारी (ता. ११) व शनिवारी (ता. १२) सलग दोन मोटारी अपघातग्रस्त होऊन दरीत कोसळल्या होत्या. बेळगावहून गोव्याला मालवाहतूक करणारी पिकअप व पुण्याहून गोव्याकडे येत असलेल्या पर्यटकांची मोटार काल तिलारी घाट उतरून गोव्याच्या दिशेने येत होती. जयकर पॉइंट येथील अवघड वळणावर चालकांचे नियंत्रण सुटले आणि दोन्ही वाहने कठडा तोडून सुमारे १५० फूट दरीत कोसळली. अपघातग्रस्त वाहनांना काढण्यासाठी संबंधितांनी बेळगाव येथील वाजीद इब्राहिम अत्तार यांची क्रेन मागवली होती. चालक अर्शफ अन्सारी हा त्यांच्या क्रेनवर नोकरीला आहे. त्याच्याबरोबर अत्तार यांचा भाऊ जावेद हाही क्रेनमधून आला होता. दरीतील मोटार काढत असताना अन्सारी याचा वाहनावरील ताबा सुटला. क्रेनमधील जावेद खाली फेकला गेला. त्याच्या अंगावर क्रेन पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; तर अन्सारी जखमी झाला.
या अपघाताची माहिती समजताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेबाबत चंदगड पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. सकाळी दहाच्या दरम्यान मृतदेह बाहेर काढण्यात आला. क्रेनचे मालक वाजीद यांनी अपघाताची चंदगड पोलिस ठाण्यात वर्दी दिली. त्यानुसार चालक अर्शफ याच्याविरुद्ध चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.