शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर

शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर

02528
हलकर्णी ः यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात कृषी प्रदर्शनाची पाहणी गोपाळराव पाटील, संजय पाटील, विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर आदींनी केली.
------------------------------------
शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर
गोपाळराव पाटील; हलकर्णी महाविद्यालयात कृषी प्रदर्शनाला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. १६ ः आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि योग्य नियोजन करून शेती केली तरच ती फायदेशीर ठरेल, असे मत दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील यांनी व्यक्त केले. हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आयोजित कृषी प्रदर्शन व शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते.
प्रकाश राऊत यांनी ऊस लागवड व खत व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले. पीक म्हणजे एक जीव आहे. त्याच्या गरजा ओळखून संतुलित घटक पुरवायला हवेत, असे मत मांडले. उमेश पाटील यांनी आंतरराष्ट्रीय पौष्‍टिक तृणधान्य वर्ष या विषयावर मार्गदर्शन केले. नाचणी, बाजरी, गहू यातून शरीराला आवश्यक घटक मिळतात. त्याचा आहारात वापर करायला हवा असे सांगितले. प्रदर्शनात खते, बी- बियाणे, तण नाशके, कीटकनाशके, सेंद्रिय उत्पादने, नाचणी उत्पादने, ट्रॅक्टर, औजारे आदी वस्तूंचे स्टॉल्स मांडले होते. युवराज पाटील, रामदास पाटील, रामचंद्र आंबोलकर, मोहन पाटील, बाळाराम गडकरी, अजिंक्य सावंत, सचिन पाटील, युवराज पाटील, सागर चिखलकर, ऋषीकेश सावंत, नितीन सुभेदार, गणपती पवार, दिलीप पाटील यांनी स्टॉलवरील साहित्याबद्दल माहिती दिली. संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, प्रा. एस. डी.तावदारे, जे. बी. पाटील, प्रभाकर खांडेकर, जगन्नाथ हुलजी, विलास पाटील, शिवाजी सावंत, विष्णू गावडे, उदय देशपांडे, विजय जाधव उपस्थित होते. प्रा. जी. जे. गावडे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. राजेश घोरपडे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com