दाटे येथे आज काजू पिकावर परिसंवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाटे येथे आज काजू पिकावर परिसंवाद
दाटे येथे आज काजू पिकावर परिसंवाद

दाटे येथे आज काजू पिकावर परिसंवाद

sakal_logo
By

दाटे येथे आज काजू पिकावर परिसंवाद
चंदगड : दाटे (ता. चंदगड) येथे उद्या (ता. १७) काजू लागवड व व्यवस्थापन या विषयावर एक दिवसीय परिसंवाद होत आहे. भारत सरकारचे कोची येथील काजू आणि कोको विकास निदेशालयाचे संचालक डॉ. वेंकटेश एन. हुब्बली व कणबरगी (जि. बेळगाव) येथील एचआरईसीचे प्रमुख नवीन एम. पुट्टास्वामी मार्गदर्शन करणार आहेत. नाबार्डचे आशुतोष जाधव, जिल्हा कृषी अधिकारी दत्तात्रय दिवेकर, कणेरी येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रविंद्र सिंह प्रमुख उपस्थित राहणार आहेत. बळीराजा काजू संघर्ष समिती, दाटे, मांडेदूर्ग व ढोलगरवाडी ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून हा परीसंवाद होणार आहे. शास्त्रीय काजू लागवड, मोहर व्यवस्थापन, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, एकात्मिक खत व्यवस्थापन, काजू प्रक्रीया उद्योग या विषयावर माहिती दिली जाणार आहे. ज्ञानेश्वर मंदिराच्या सभागृहात सकाळी दहा वाजता कार्यक्रमाला सुरवात होईल. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.