विद्यार्थिनीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थिनीची आत्महत्या
विद्यार्थिनीची आत्महत्या

विद्यार्थिनीची आत्महत्या

sakal_logo
By

02794
-------

बारावी परीक्षेत कमी गुण
मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

चंदगड, ता.२८ : हलकर्णी (ता. चंदगड) येथील मनाली मधुकर सावंत ( वय १८ ) या विद्यार्थिनीने बारावीच्या परीक्षेत कमी गुण मिळाल्याच्या नाराजीतून गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी ( ता. २७ ) दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला. मनालीने घराच्या दुसऱ्या मजल्यावर तुळशीला गळफास घेतल्याचे पाहून आई संगीता हिने तिला पायाकडच्या बाजूने उचलून धरले व आरडाओरड केली. शेजाऱ्यांनी येऊन तिला खाली उतरवून घेतले. बेशुद्ध अवस्थेत तिला बेळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद येथील पोलिस ठाण्यात झाली आहे.