शिवशक्ती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवशक्ती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
शिवशक्ती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

शिवशक्ती हायस्कूलच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा

sakal_logo
By

02796
अडकूर ः शिवशक्ती हायस्कूलचे विद्यार्थी ३१ वर्षानंतर एकत्र आले.
----------------------------------------------------------------------------
शिवशक्ती हायस्कूलच्या
माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. २९ ः अडकूर (ता. चंदगड) येथील शिवशक्ती हायस्कूलचे ३१ वर्षापूर्वी दहावीला एकत्र असलेले विद्यार्थी स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने एकत्र आले. जुन्या आठवणींना उजाळात देत मैत्रीचा जिव्हाळा फुलला. यापुढील काळात सातत्याने एकमेकाच्या संपर्कात राहून सुख- दुःखात सहभागी होण्याचा निर्धार केला.
दहावीनंतर प्रत्येकाने मार्ग बदलले. पुढील शिक्षण पूर्ण करुन काहीजण विविध क्षेत्रात स्थीरावले. काहींनी व्यवसाय पत्करला. काही शेतीतच रमले. स्नेहमेळाव्यानिमित्त ते पुन्हा एकदा एकत्र आले. एकमेकांची विचारपूस केली. आपल्याच वर्गात बसणारे मित्रांचे करिअर काय हे जाणून घेतले. ज्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे. त्यांचे कौतुक झाले. ज्यांना अजूनही मदतीचा हा देणे गरजेचे आहे, त्यांच्यासाठी सदैव तत्पर राहण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
ज्या वर्गात त्यांनी अध्यापन केले त्याच वर्गात बसून जून्या स्मृतींना उजाळा दिला. शालेय जीवन किती सुखकारक असते याविषयी प्रत्येकजण भरभरुन बोलला. शिक्षणाच्या माध्यमातून तयार झालेले मैत्रीचे नाते मधल्या काळात खंडीत झाले होते ते पुन्हा एकदा प्रवाही करण्याचा निर्णय घेतला. यापुढील काळात प्रत्येकाच्या सुख- दुःखाच्या प्रसंगात सहभागी होऊन हा जिव्हाळा आणखी दृढ करण्याचे ठरले.