
हरेर यांनी शिक्षकाची प्रतिमा प्रामाणिकपणे जोपासली
02841
नागनवाडी ः एस. के. हरेर यांचा सपत्नीक सत्कार जे. बी. पाटील, सुषमा पाटील यांनी केला. यावेळी मान्यवर उपस्थित होते.
----------------------------------------------------------------------------
हरेर यांचा निवृत्तीनिमित्त सत्कार
चंदगड, ता. ५ ः धनंजय विद्यालयाचे प्राचार्य एस. के. हरेर यांनी शिक्षकाची प्रतिमा प्रामाणिकपणे जोपासली. शिक्षक कसा असावा याचे ते मूर्तीमंत उदाहरण आहेत, असे मत शारदा शिक्षण मंडळाचे सचिव जे. बी. पाटील यांनी व्यक्त केले. नागनवाडी (ता. चंदगड) येथे हरेर यांच्या निवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
जे. बी. पाटील यांच्याहस्ते हरेर यांचा सपत्नीक सत्कार झाला. निवृत्त उपशिक्षणाधिकारी एस. बी. पाटणकर, बाळासाहेब बांदिवडेकर, डॉ. श्रीकांत सावंत, मारुतीराव घुरे, विलास पाटील, शांताराम पाटील, सुषमा पाटील, एन. डी. पाटील, प्रा. कुबल, मारुतीराव कटाळे, शिवाजी हरेर, गंगाराम पाटील, फगरे, एस. एम. पाटील, भरमू घोळसे आदींनी शुभेच्छा व्यक्त केल्या. सत्काराला उत्तर देताना हरेर म्हणाले, ‘शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना स्थानिक पातळीवरील राजकारण, समाजकारणातही काम केले. परंतु गल्लत होऊ दिली नाही.’ एस. एस. देवरमणी, बसवंत अडकूरकर, मोहन परब, यशवंत घोळसे आदी उपस्थित होते. डी. डी. बेळगावकर यांनी प्रास्ताविक केले. पी. एम. चव्हाण यांनी आभार मानले. एच. आर. पाऊसकर यांनी सूत्रसंचालन केले.