पारगडवर घुमला छत्रपतींचा जयघोष

पारगडवर घुमला छत्रपतींचा जयघोष

02843
पारगड ः मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करताना तरुणी.
-----------------------------------------------------------------------
पारगडवर घुमला छत्रपतींचा जयघोष
शिवराज्याभिषेक सोहळा, मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके, शेकडो शिवभक्तांची हजेरी
सुनील कोंडुसकर ः सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ६ ः आज भल्या पहाटेच किल्ले पारगडला जाग आली. भगवी कपडे, भगव्या टोप्या घातलेल्या शिवप्रेमींची लगबग वाढली. प्रत्येकजण नेमून दिलेली कामे नियोजनबध्द पध्दतीने करीत होता. भवानी मातेचे दर्शन घेऊन भक्तांची पावले सदरेवरील शिवछत्रपतींच्या पुतळ्याकडे वळू लागली. बघता बघता शेकडों कार्यकर्ते एकत्र आले. प्रारंभी काकड आरतीने गडावरील वातावरण पावित्र्याने भारले.
शतकानुशतके हृदयसिंहासनावर राज्य करणाऱ्या लाडक्या राजाचा प्रतिमेला अभिषेक झाला आणि पारगडच्या कडेकपारीत शिवछत्रपतींचा जयघोष निनादला. निमित्त होते शिवराज्याभिषेक सोहळ्याचे. मजरे कार्वे (ता. चंदगड) येथील शहीद जवान वेलफेअर असोशिएशन, ग्रामस्थ आणि पारगड ग्रामस्थ यांच्या वतीने शेकडो शिवभक्तांच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा झाला.
सोमवारी (ता. ५) कार्यकर्त्यांनी गडाची स्वच्छता करुन सुशोभिकरण करण्यात आले. गड पूजन झाले. रात्री गोंधळ, भजन, शाहीर रंगराव पाटील यांचा शाहीरी कार्यक्रम आदी विधींनी जागरण करण्यात आली. आज पहाटे शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरवात झाली. पहाटे काकड आरती झाली. आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. त्यानंतर शिव प्रतिमेला अभिषेक घालण्यात आला. पराग निट्टूरकर यांनी मंत्रोच्चार केले. भंडाऱ्याची उधळण करुन आणि छत्रपतींचा नामघोष करुन जल्लोष करण्यात आला. भगवे ध्वज, भगवी वस्त्रे, भगव्या टोप्या आणि भगव्या पताका यामुळे गडाला भगवे स्वरुप प्राप्त झाले होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा सोहळा अनेकांसाठी ऊर्जादायी ठरला. पांडुरंग बेनके, रायबा मालुसरे, रघुवीर शेलार, शिवाजी तुपारे, देवाप्पा बोकडे, तानाजी गडकरी, अशोक हारकारे, एस. आर.पाटील यांच्यासह चंदगड, आजरा, गडहिंग्लज, बेळगाव सीमा भाग, गोव्यातील शिवभक्त उपस्थित होते.
----------
शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके
वेंगरुळ (ता. भुदरगड) येथील सव्यसाची गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युध्दकलेची प्रात्यक्षिके सादर केली. या कलेमध्ये तरुणींचा सहभाग पाहून उपस्थित थक्क झाले. लेझीम पथकही आकर्षण ठरले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com