सीए परीक्षेत यश

सीए परीक्षेत यश

Published on

फोटो chd51.jpg
03025
प्रथमेश काणेकर

आई- वडिलांच्या पाठिंब्यावर
आजोबांचे स्वप्न साकारले

प्रथमेश काणेकर; सनदी लेखापाल परीक्षेत यश

चंदगड, ता. ६ ः आठवडा बाजारातून व्यापार हा पारंपरिक व्यवसाय. छोट्या व्यवसायातून त्यांनी काजू प्रक्रियेसारख्या मोठ्या उद्योगात पदार्पण केले. आर्थिक उलाढालीचे नियंत्रण करण्यासाठी सनदी लेखापालाशी संपर्क आला. कुटुंबातील कोणीतरी अशा पदावर असावे अशी अपेक्षा सुधाकर काणेकर यांनी व्यक्त केली आणि नातू प्रथमेश याने ती फळाला आणली. साडेपाच वर्षात हा अभ्यासक्रम पूर्ण केला.
येथील नगराध्यक्षा प्राची काणेकर व पंचायत समिती माजी सदस्य दयानंद काणेकर यांचा प्रथमेश एकुलता मुलगा. प्राथमिक शिक्षण गावात जिल्हा परिषद शाळेत झाले. बारावीला त्याला ८६ टक्के गुण मिळाले. त्यानंतर त्याने कोल्हापूरला पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. सीए फाऊंडेशन परीक्षा उत्तीर्ण करुन अभ्यासक्रमाला सुरवात केली. सुरवातीची तीन वर्षे विनाअडथळा सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या. शेवटच्या परीक्षेवेळी कोरोनामुळे काहीशी शिथीलता आली. मात्र आई-वडिलांनी धीर दिला. संयम ढळू न देता जोमाने अभ्यास करुन पदवी मिळवली. त्याला सर्जेराव सासवडे, स्वरुप अमलझारे, स्वप्नील शेटे यांचे मार्गदर्शन लाभले. या पदवीचा अभ्यास करीत असतानाच त्याने चंदगड आणि परीसरातील दहा तरुणांना या अभ्यासक्रमाकडे वळवले.
-------
सीएचा पदवी संपादन करताना संयम महत्वाचा आहे. अपयशाने खचून न जाता सातत्याने परीक्षा देत राहणे गरजेचे आहे. योग्य नियोजन आणि कष्टपूर्वक अभ्यासातून हे यश नक्की मिळतेच.
-प्रथमेश काणेकर, सीए परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.