चंदगड तालुका संघाच्या अध्यक्षपदी आमदार राजेश पाटील

चंदगड तालुका संघाच्या अध्यक्षपदी आमदार राजेश पाटील

Published on

03674
राजेश पाटील
03673
तानाजी गडकरी
---------------------------
चंदगड तालुका संघाच्या अध्यक्षपदी आमदार राजेश पाटील
सकाळ वृत्तसेवा
चंदगड, ता. ३ : चंदगड तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी आमदार राजेश पाटील तर उपाध्यक्षपदी तानाजी गडकरी यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध झाली. त्यानंतर झालेल्या संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत ही निवड केली. अध्यक्षस्थानी निवडणूक अधिकारी एस. बी. येझरे होते.
अध्यक्षपदासाठी आमदार पाटील यांचे नाव अभय देसाई यांनी सुचवले. त्याला जानबा चौगुले यांनी अनुमोदन दिले. उपाध्यक्ष पदासाठीचे गडकरी यांचे नाव परशराम पाटील यांनी सुचवले. त्याला अनिल सुरतकर यांनी अनुमोदन दिले. संचालक विठोबा गावडे, परशराम पाटील, पोमाण्णा पाटील, तानाजी गडकरी, बाळासो घोडके, दयानंद पाटील, अल्ली मुल्ला, महादेव चौकुळकर, गोविंद अमृसकर, अशोक तुपारे आदी उपस्थित होते. व्यवस्थापक एस. वाय. पाटील यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.