गव्याच्या हल्ल्यात एकजण ठार

गव्याच्या हल्ल्यात एकजण ठार
Published on

गव्याच्या हल्ल्यात
अडकूरमध्ये
शेतमजूर ठार
चंदगड, ता. ३ : अडकूर (ता. चंदगड) येथे आज गावठाण नावाच्या शेतात गव्याने धडक दिल्याने वृक्षतोड मजूर जागीच ठार झाला. यल्लाप्पा मल्लाप्पा गुड्डाकाई (वय ५०, रा. बोळशनट्टी, ता. हुक्केरी, जि. बेळगाव) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सकाळी सव्वादहाच्या सुमारास घडली.
अडकूर येथील सदानंद देसाई यांनी त्यांच्या मालकीची झाडे लाकूड ठेकेदाराला विक्री केली आहेत. कर्नाटकातील मजुरांकडून त्याची तोडणी सुरू होती. सकाळी दहाच्या सुमारास गुड्डाकाई ओढ्याकडेला प्रात:र्विधीसाठी गेले होते. त्यावेळी बसलेल्या स्थितीतच गव्याने त्यांना जोराची धडक दिली. यात त्यांच्या डोकीला, डाव्या हाताला व खांद्याला गंभीर दुखापत झाली. कानातून रक्त वाहू लागले. अन्य मजुरांनी त्यांना तातडीने अडकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर चंदगड येथे उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. येथील पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. मारुती यल्लाप्पा सनदी यांनी याची वर्दी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com