कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर खड्डे ठरतायत मृत्यूचा सापळा

कोल्हापूर - रत्नागिरी महामार्गावर खड्डे ठरतायत मृत्यूचा सापळा

00362
देवाळे : जेऊर फाटा येथे अपघाताला कारण ठरणारा खड्डा.

कोल्हापूर-रत्नागिरी राज्यमार्गावरील
खड्ड्यांमुळे वाहनचालकांची कसरत
देवाळे, ता. ९ : कोल्हापूर-रत्नागिरी हा राज्यमार्ग वाढत्या अपघातांमुळे सतत चर्चेत आहे. या मार्गावरील खड्डे चुकवताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याच मार्गावरील जेऊर (ता. पन्हाळा) फाटा येथे अपघातांचे सर्वाधिक प्रमाण वाढले आहे.
येथील खड्ड्यांमुळे अपघात होऊन लोक जखमी होत आहेत. तसेच खड्डा चुकवण्यासाठी चालक वाहन घेऊन पूर्णपणे रस्त्याच्या विरुद्ध बाजूला जात आहेत. त्यातच समोरून येणारा रस्ता वळणाचा व खोलगट असल्याने अपघात होत आहेत.
याकडे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे प्रवाशांच्या जीवावर बेतत आहेत. रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करताना निकृष्ट प्रतीचे काम केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे तत्काळ खड्डे भरावेत, अशी मागणी होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com