
भैरवनाथ सहकारी दूध संस्थेचा रौप्य महोत्सव
00375
जेऊर (ता. पन्हाळा) : येथील भैरवनाथ दूध संस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात बोलताना आमदार विनय कोरे.
भैरवनाथ दूध संस्थेचा
रौप्यमहोत्सव उत्साहात
देवाळे : भैरवनाथ दूध संस्थेने दूध उत्पादकांचे हित जपताना सहकाराचा मूलमंत्र जोपासले आहे, असे प्रतिपादन वारणा उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी केले. जेऊर (ता. पन्हाळा) येथील श्री भैरवनाथ सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या समारंभानिमित्त आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘कोरोनाच्या महामारीमध्ये सर्व प्रकारचे उद्योग, व्यवसाय बंद असताना ग्रामीण भागात दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना तारले. गायींचे दुधरूपी अमृत समाजापर्यंत पोहोचवणारे दूध उत्पादक हेच खरे देवदूत आहेत. पन्हाळा बांधारीच्या विकासासाठी केंद्र सरकारच्या अमृत सरोवर योजनेतून निधी आणून येथील शेतीसाठी पाणी आणण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.’’ या वेळी आमदार डॉ. विनय कोरे यांच्या हस्ते दूध उत्पादक सभासदांना संस्थेतर्फे सोन्याचे नाणे देऊन सत्कार करण्यात आला. वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, संचालक शिवाजी मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पाटील, अनिल कंदुरकर, विश्वास पाटील, आशिष पाटील, बाळाराम शिंदे, प्रा आनंद गिरी, सरपंच संजीवनी दाभोळकर, विक्रम पाटील, निरंजन सरवदे, वैशाली खेतल, सजाक्का चिले, उत्तम कंदूरकर, बाळासो खांडेकर, सुभाष खांडेकर उपस्थित होते. भीमराव पाटील यांनी प्रास्ताविक केले. कृष्णात जमदाडे यांनी सूत्रसंचालन केले. सुभाष माने यांनी आभार मानले.