जिल्हा ग्रंथालय संघातर्फे  उत्कृष्ट ग्रंथालय व आदर्श ग्रंथालय  व सेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन

जिल्हा ग्रंथालय संघातर्फे उत्कृष्ट ग्रंथालय व आदर्श ग्रंथालय व सेवक पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्यासाठी आवाहन

ग्रंथालय संघाचे
पुरस्कारासाठी आवाहन
देवाळे : जिल्हा ग्रंथालय संघातर्फे देण्यात येणाऱ्या अ.ब.क.ड. वर्गातील आदर्श सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार, आदर्श कार्यकर्ता पुरस्कार व ग्रंथालयात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या सेवकास ग्रंथ मित्र स्व. तानाजीराव मगदूम स्मृती आदर्श सेवक पुरस्कार देण्यात येणार आहेत. सार्वजनिक ग्रंथालये कार्यकर्ते व सेवक यांनी पुरस्कारासाठी प्रस्ताव कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाकडे पाठवण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा सुशांत मगदूम यांनी केले आहे. कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघाच्या वतीने दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यात चारही श्रेणीतील ग्रंथालयांना आदर्श सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार देण्यात येतो. तसेच वाचन चळवळ वाढावी यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यासाठी आदर्श कार्यकर्ता पुरस्कार तर ग्रंथालयातील सेवक वर्गासाठी ग्रंथमित्र स्वर्गीय तानाजीराव मगदूम स्मृती आदर्श सेवक पुरस्कार यावर्षीपासून देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील ग्रंथालयांनी १५ जानेवारीपर्यंत अर्ज करावेत. यानंतर आलेल्या प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. निवड झालेल्या पुरस्काराचे वितरण २८ जानेवारीला पुणे विभाग ग्रंथालय संघ व कोल्हापूर जिल्हा ग्रंथालय संघ यांच्या घुणकी (ता. हातकणंगले) इथे संपन्न होणाऱ्या संयुक्त अधिवेशनात वितरण करण्यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com