झापाचीवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

झापाचीवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू
झापाचीवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

झापाचीवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू

sakal_logo
By

झापाचीवाडी प्रकल्पातून विसर्ग
धामोड, ता. २२ : झापाचीवाडी (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील अंतर्गत कामे सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे धामणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, चार गावांतील नदीकाठचे उसाचे पीक पाण्याखाली गेले आहे. झापाचीवाडी येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य भिंतीच्या दगडी अस्तरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे प्रकल्पातून पहिल्यांदाच पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे धामणी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. धामणी नदीवरील म्हासुर्ली व गवशी हे मातीचे बंधारे पूर्ण क्षमतेने भरले असून अतिरिक्त पाणी नदीकाठच्या शेतामध्ये गेले आहे. नदीकाठचे तोडणीस आलेले सावतवाडी, चौधरवाडी, गवशी, म्हासुर्ली , धुंदवडे येथील उसाचे पीक पाण्याखाली गेले असून शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.