Tue, March 28, 2023

अंगणवाडी इमारतीची प्रतीक्षा
अंगणवाडी इमारतीची प्रतीक्षा
Published on : 12 March 2023, 12:51 pm
धामोडमध्ये अंगणवाडीला इमारतीची प्रतीक्षा
धामोड : येथील अंगणवाडीला इमारतीची प्रतीक्षा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मागणी करून देखील इमारत नसल्याने कृषी कार्यालयाच्या इमारतीचा तात्पुरता आधार येथील विद्यार्थ्यांनी घेतला आहे. या अंगणवाडीला नवीन इमारत मिळावी, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे . येथे तीन अंगणवाड्या कार्यरत आहेत. यापैकी दोन अंगणवाड्यांना स्वतःच्या मालकीची इमारत आहे. मात्र एका अंगणवाडीला अद्यापही इमारतीची प्रतीक्षा आहे. त्यामुळे कृषी कार्यालयाच्या इमारतीमध्ये ही अंगणवाडी भरवली जाते.