खामकरवाडी प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा

खामकरवाडी प्रकल्पात 30 टक्के पाणीसाठा

01085

खामकरवाडी ःयेथील लघु पाटबंधारे प्रकल्पाची पाणी पातळी खालावली आहे.
...

खामकरवाडी प्रकल्पात ३० टक्के पाणीसाठा

धामोड : खामकरवाडी (ता. राधानगरी) येथील लघु पाटबंधारे प्रकल्पातील पाणीपातळी कमालीची घटली आहे. मे अखेर पाणीसाठा शिल्लक राहण्याची शक्यता कमी असल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. थेट प्रकल्पातील पाणी उपशावर नियंत्रणांची गरज आहे. अन्यथा तीन गावांना शेतीसह पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. येथील खडकीच्या ओढ्यावरील लघु पाटबंधारे प्रकल्पात १०८७ सहस्त्र घनमीटर इतका पाणीसाठा होतो. गेल्या दोन वर्षांमध्ये तीन गावातील शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्चून खडकाळ जमीन लागवडीखाली आणली आहे. कोरडवाहू जमिनींना किमान दहा दिवसांत पाण्याची गरज आहे. मात्र प्रकल्पातील पाणी पातळी २१ दिवसांत कमालीची घटली आहे . प्रकल्पात केवळ ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे मे अखेर पाणीटंचाईची शक्यता असल्याने शेतकरी वर्गाची घालमेल सुरू आहे . थेट प्रकल्पातून वीज पंपाने शेतीसाठी होत असलेल्या उपशावर नियंत्रणाची गरज आहे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com