धामोड येथे बनावट नोटा सापडल्या

धामोड येथे बनावट नोटा सापडल्या

Published on

बनावट नोटा सापडल्याची
धामोड बाजारपेठेत चर्चा

व्यापाऱ्यांत खळबळ ः मद्य, औषध विक्रेत्याकडे आढळल्या

धामोड, ता.८ : राधानगरी तालुक्यातील धामोड येथे बाजारपेठेत दोन व्यापाऱ्यांना व्यवहारात शंभर व दोनशे रुपयांच्या बनावट नोटा आढळल्याने खळबळ उडाली. पण पोलिस तपासाचा नाहक ससेमिरा लागेल या भितीने त्या व्यापाऱ्यांनी तक्रार देण्यास असमर्थता दर्शवली. मात्र चलनात बनावट नोटा सापडल्याची बातमी आज आठवडी बाजारात पसरल्याने व्यापाऱ्यांत घबराट पसरली होती. या परिसरात बनावट नोटा सापडण्याची ही पहिलीच घटना आहे.
धामोड हे परिसरातील ४० गावांच्या बाजारपेठेचे मुख्य केंद्र आहे. येथे बँका, शाळा, दवाखाने या निमित्ताने सातत्याने लोकांची मोठी वर्दळ असते. राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरातील ही प्रमुख बाजारपेठ असून येथे दर दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होते. चार-पाच दिवसांपूर्वी येथील एका बीअरबार व्यावसायिकाला दोनशे रुपयांच्या दोन बनावट नोटा आढळून आल्याचे समजते. काल, शुक्रवारी (ता.६ ) बाजारपेठेतील एका औषध दुकानदाराला व्यवहारातून शंभर रुपयाची एक बनावट नोट आढळली असल्याचे समजते. मात्र संबंधित व्यापाऱ्यांनी पोलिसांचा चौकशीचा ससेमिरा नको म्हणून तक्रार देण्याचे टाळले. पण या बनावट नोटेबाबतची चर्चा आज आठवडी बाजारामध्ये पसरल्याने व्यापाऱ्यांत खळबळ माजली. बनावट नोटा आढळलेल्या बिअरबार व्यावसायिक व औषध दुकानदार यांच्याशी बाजारपेठेतील काही व्यापाऱ्यांनी संपर्क साधून पोलिसांत तक्रार देण्याची विनंती केली, पण संबधित व्यावसायिकांनी तक्रार देण्याचे टाळले.

कोट..:
धामोड येथे बाजारपेठेत काही व्यावसायिकांकडे चलनात बनावट नोटा आल्याचे वृत्त समजले. परंतु व्यापारी संघटनेकडे याबाबत कोणत्याही व्यापारने अद्याप तक्रार दिलेली नाही.
- राजू कोपार्डेकर, सचिव, धामोड व्यापारी संघटना.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.