पाण्याअभावी ऊस वाळू लागला

पाण्याअभावी ऊस वाळू लागला

01591
पखालेवाडी (ता. राधानगरी) येथे धामणी नदी कोरडी पडल्याने उसाचे पीक पाण्याअभावी वाळू लागले आहे. (छायाचित्र : केरबा जाधव)
.........
पाण्याअभावी ऊस वाळू लागला

धामणी परिसरातील चित्र ः शेतकऱ्यांना वळवाची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. २३ : गेल्या आठवड्यापासून राधानगरी तालुक्याच्या पश्चिम परिसरात वळीव पाऊस हुलकावणी देत आहे. पंधरा दिवसांपूर्वी धामणी नदी कोरडीठाक पडली असताना येथील बळिराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र, या परिसरात वातावरण वळीव पावसाला पोषक बनते, परंतु वाऱ्याच्या प्रवाहामुळे पाऊस हुलकावणी देत आहे. धामणी नदी कोरडीठाक आणि वळवाची हुलकावणी अशा चक्रव्यूहात येथील ऊस पीक वाळू लागले आहे.
सध्या धामणी नदीच्या काठावरील तीन तालुक्यांतील २३ गावांना पाण्याचे मोठे दुर्भिक्ष्य भेडसावत आहे. नदी कोरडी पडल्याने स्वखर्चातून उभारलेले मातीचे बंधारे शेतकऱ्यांनी काढले आहेत. परिसरात सध्या उसाचे पीक समाधानकारक असून, हिरवेगार उसाचे मळे डोलत आहेत. वर्षभर येथील शेतकऱ्यांनी ऊस पीक घेण्यासाठी धामणी नदीवर मातीचे बंधारे घालून पाण्याच्या नियोजनासाठी उपसा बंदीचे वेळापत्रक तयार केले.
धामणी प्रकल्प पूर्ण झाला नसल्याने गेल्या अनेक वर्षांपासून येथील शेतकऱ्याला पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. यावर्षीही शेतकऱ्यांनी नियोजनबद्ध पाण्याचा शेतीसाठी वापर केला. वर्षभर कष्ट करून येथील शेतकऱ्यांनी ऊस पिकवला, परंतु पाण्याअभावी वाळू लागला आहे. उसासाठी शेतकऱ्याला मोठ्या वळवाची नितांत गरज आहे. गेल्या आठवड्यापासून परिसरात वळवाला पोषक वातावरण तयार होते. मात्र, वळीव हुलकावणी देत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. पाण्याअभावी धामणी परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्रातील ऊस पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे बळीराजाला मोठ्या वळवाच्या प्रतीक्षेत आहे.
...
कोट...
यावर्षी ऊस पीक अत्यंत चांगल्या प्रकारे आहे. धामणी नदीवर स्वखर्चातून बांधलेल्या मातीच्या बंधाऱ्यामधील पाणी संपल्याने पाण्याअभावी पिके वाळू लागली आहेत. त्यामुळे वळवाची प्रतीक्षा लागून राहिली आहे.
सयाजी पाटील, शेतकरी, असंडोली
..................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com