दूध संस्थांच्या इमारतीसाठी अनुदान वाढविण्याचा प्रस्ताव

दूध संस्थांच्या इमारतीसाठी अनुदान वाढविण्याचा प्रस्ताव

दूध संस्थांच्या इमारतीसाठी अनुदान वाढविण्याचा प्रस्ताव

गोकुळचे अध्यक्ष डोंगळे ः धामोडला जोंधळेकर संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्‍घाटन

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. ७ : जिल्ह्यात गावोगावी उभारलेल्या दूध संस्थांच्या टुमदार इमारती या गोकुळच्या माध्यमातून झालेल्या सहकारी दुग्ध व्यवसायाच्या विकासाचे प्रतीक आहेत. लवकरच दूध संस्थांच्या इमारतीसाठीचे अनुदान वाढविण्याचा संचालक मंडळाचा प्रस्ताव असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुणकुमार डोंगळे यांनी दिली.
धामोड पैकी जाधववाडी (ता. राधानगरी) येथील कै. ज्ञानदेव जोंधळेकर दूध संस्थेच्या नूतन इमारतीच्या उद्‍घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी गोकुळचे संचालक प्रा. किसनराव चौगले होते.
डोंगळे म्हणाले, ‘जिल्ह्यातील अनेक गाय दूध उत्पादक काही तांत्रिक त्रुटीमुळे शासनाच्या अनुदानापासून वंचित राहिले असून या उर्वरित उत्पादकांनाही अनुदान मिळावे यासाठी ना. हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून दुग्धविकास मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे .
स्वागत संस्थेचे संस्थापक उपसरपंच बाजीराव जोंधळेकर यांनी केले. याप्रसंगी अरुणकुमार डोंगळे आणि प्रा. किसनराव चौगले यांच्या हस्ते संस्थेच्या नामफलकाचे आणि नूतन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य विनय पाटील यांचीही भाषणे झाले.
या कार्यक्रमास छत्रपती राजाराम चे माजी संचालक के पी चारापले, सरपंच सौ भारती कांबळे,शाकीर पाटील,माजी सरपंच के एल पाटील, प्रवीण पाटील, दीपक पाटील, शंकर जाधव, सागर पाटील,गोकुळचे दूध संकलन अधिकारी ए एल पाटील, सहाय्यक दूध संकलन अधिकारी राजेंद्र चौगले, मुकुंद पाटील उदय पाटील आदी मान्यवरासह दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश जाधव यांनी केले तर आभार सुरेश कांगणे यांनी मानले.
फोटो ओळी :- धामोड पैकी जाधववाडी ( ता . राधानगरी ) येथे कै ज्ञानदेव जोंधळेकर दूध संस्थेच्या उद्घाटनप्रसंगी अरुण कुमार डोंगळे, प्रा किसनराव चौगले,विनय पाटील , बाजीराव जोंधळेकर, शाकीर पाटील आदी मान्यवर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com