कुपलेवाडी ग्रामस्थ भीतीच्या छायेत

कुपलेवाडी ग्रामस्थ भीतीच्या छायेत

1689
कोनोली पैकी कुपलेवाडी ः येथे २१ जुलै २०२१ रोजी भूस्खलन झाल्याने पडलेले घर.
....
कुपलेवाडी ग्रामस्थ भीतीच्या छायेत

भूस्खलनाचा इशारा ः ग्रामपंचायतीकडून शाळेत निवाऱ्याची सोय

सकाळ वृत्तसेवा
धामोड, ता. १० : तीन वर्षांपूर्वी भूस्खलन होऊन दाम्पत्याचा मृत्यू झालेल्या कोनोली पैकी कुपलेवाडी (ता. राधानगरी) येथील ग्रामस्थ हवामान खात्याने भूस्खलनाचा इशारा दिल्याने भीतीच्या छायाखाली वावरत आहेत. या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे त्यांची निवाऱ्याची तात्पुरती सोय प्रशासनाने शाळेत केली आहे.
कोनोली पैकी कुपलेवाडी येथे २१ जुलै २०२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला होता. यावेळी येथे गावाशेजारीचा डोंगराला भेगा पडून मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले होते. यामध्ये एका दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर काही जनावरे आणि घरे डोंगराच्या ढिगाऱ्याखाली गडप झाली होती. या घटनेस तीन वर्षे झाली आहेत. सध्या या परिसरात पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी डोंगरांना भेगा पडल्याने येथील ग्रामस्थांच्या जीवितास धोका कायम आहे.
प्रशासनाकडून ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचा प्रश्न बेदखल केल्यामुळे येथील नागरिक जीव मुठीत घेऊन वावरत आहेत. तसेच डोंगर कपारीत वसलेल्या आणि सुमारे ४० घरे असणाऱ्या या गावाशेजारच्या डोंगरास मोठ्या प्रमाणावर भेगा गेल्या आहेत. यामुळे येथील नागरिकही हवालदिल झाले आहेत. दरम्यान, आज भारतीय हवामान खात्याच्या आजच्या अंदाजानुसार हा परिसर ‘रेड झोन’मध्ये येत असून, या परिसरात आज जोरदार पर्जन्यवृष्टी होऊन मोठ्या प्रमाणावर भूस्खलन होण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत आहेत. या दोन्ही ठिकाणच्या नागरिकांच्या पुनर्वसनाचा विषय लालफितीत अडकल्याने नागरिकांना त्याच वस्तीत राहणे अनिवार्य बनले आहे.
....
कोट....
भूस्खलनाच्या पार्श्वभूमीवर कुपलेवाडी व पखालेवाडी येथील ७८ कुटुंबांना प्रशासनाच्या वतीने इतरत्र स्थलांतराच्या सूचना दिल्या आहेत. तसेच अतिवृष्टीच्या काळामध्ये निवाऱ्याची सोय शाळेमध्ये केलेली आहे. आपत्कालीन विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
यशवंत कुंभार, ग्रामसेवक, कोनोली तर्फ असंडोली

कोट...
तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे येथे दाम्पत्य ठार झाले तसेच मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली होती. हवामान खात्याने या परिसरात भूस्खलनाचा इशारा दिल्याने पुन्हा एकदा ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत. प्रशासनाने याबाबत सूचना दिल्या आहेत.
- पांडुरंग कुपले, ग्रामस्थ, कुपलेवाडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com