Wed, March 29, 2023

अमोल भंडारेची निवड
अमोल भंडारेची निवड
Published on : 20 February 2023, 11:52 am
00733
अमोल भंडारेची निवड
दानोळी ः जैनापूर (ता. शिरोळ) येथील शरद कृषी महाविद्यालयामधील खेळाडू अमोल भंडारे याची महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या शरीर सौष्ठव संघात निवड झाली आहे. कर्नाटकमधील येणेपोया विद्यापीठ डेरलकट्टे, मंगळूर येथे अखिल भारतीय आंतरविद्यापीठ शरीर सौष्ठव स्पर्धा होणार आहे. स्पर्धेत अमोल भंडारी हा खेळाडू ८५ किलो वजनी गटात सहभागी होणार आहे. संस्थेचे चेअरमन आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी भंडारी याचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.