यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर

यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबीर

यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिर
---
अनिल बागणे यांची माहिती; रुग्णांवर शासकीय योजनेतून होणार उपचार
दानोळी, ता. २ ः आमदार डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिरोळ तालुक्यातील सर्व गावांमधील जनतेसाठी ५ मेस महाआरोग्य तपासणी शिबिर होणार आहे. शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक अनिल बागणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.
शिबिर शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, यड्राव (ता. शिरोळ) येथे होणार आहे. प्रत्येक गावातून नागरिकांना आणण्यासाठी बसची सोय करण्यात आली. शिबिरात केएलई हॉस्पिटल, बेळगावचे तज्ज्ञ डॉक्टर सहभागी होणार आहेत. आमदार यड्रावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाईल. महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन श्यामराव पाटील-यड्रावकर एज्युकेशनल अॅण्ड चॅरिटेबल ट्रस्ट व राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशन, तसेच केएलई सोसायटी, केएलई युनिव्हर्सिटी, डॉ. प्रभाकर कोरे हॉस्पिटल अॅण्ड एमआरसी, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय, बेळगावतर्फे होणार असल्याचे पत्रकात म्हटले आहे.
निदान झालेल्या बाधित रुग्णांवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार केले जातील. गंभीर आजारावर केएलई बेळगाव येथे उपचारांची सोय केली जाणार असल्याची माहितीही श्री. बागणे यांनी दिली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com