
कोथळीत भूमिगत गटार कामाचा प्रारंभ
कोथळीत भूमिगत गटार कामाचा प्रारंभ
दानोळी, ता. ३० ः कोथळी येथे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या निधीतून जनसुविधा योजना २०२२-२३ अंतर्गत गटर्ससाठी मंजूर झालेल्या दहा लाखांच्या कामाचा प्रारंभ केला. क्रांती समूहाचे ज्येष्ठनेते देवगोंडा पाटील यांच्याहस्ते केला. अध्यक्षस्थानी सरपंच भरतेश खवाटे होते.
रिंग रोड लगतच्या पैलवान सुरगोंडा पाटील यांच्या घरापासून ते सुधीर मगदूम यांच्या घरापर्यंत भूमिगत गटार तसेच नाना आंबी घर ते अशोक आंबे घर आरसीसी गटार या निधीतून बांधण्यात येणार आहे.
अनेक वर्षापासून गटारीचा प्रश्न प्रलंबित होता. आमदार राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या निधीमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे, माजी उपसरपंच संजय नांदणे यांनी सांगितले. दिलीप मगदूम, राजेंद्र नांदणे, ग्रामपंचायत सदस्य नितीन वायदंडे, विलास कोरवी, माजी ग्रामपंचायत सदस्य रवी पुजारी, सागर पुजारी, आण्णाप्पा आंबी आदी उपस्थित होते.