निमशिरगांवमध्ये आजपासून विविध धार्मिक कायक्रम

निमशिरगांवमध्ये आजपासून विविध धार्मिक कायक्रम

निमशिरगावमध्ये आजपासून विविध धार्मिक कायक्रम
सकाळ वृत्तसेवा
दानोळी, ता. ९ : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे श्री श्रुतपंचमी श्रुत आराधना महामहोत्सव व भव्य जैनेश्वरी दीक्षा समारोह सोमवार (ता.१०) ते बुधवार (ता.१२) दरम्यान होणार आहे.
यावेळी गणधर वलय विधान, चातुर्मास उद्‍घोषणा, दीक्षा विधी होणार आहे. बुधवारी विद्याधर पाटील-जैन (अंकली) व राजकुमार जैन (बिना-मध्यप्रदेश) यांची मुनी दीक्षा होणार आहे. आचार्यश्री १०८ वर्धमानसागर महाराज, निर्यापकश्रमण धर्मसागर महाराज, विद्यासागर महाराज, सिध्दांतसागर महाराज यांच्यासह मुनी संघाचे पावन सान्निध्य लाभणार आहे.
सोमवारी (ता.१०) सकाळी मंगल निनाद, ध्वजवंदन, मंडप उद्‍घाटन, मंडप शुध्दी, आहारचर्या होईल. दुपारी मंडपामध्ये गणधर वलय विधान होईल. दुपारी ३ वाजता दीक्षार्थींची गोदभराई होईल. रात्री सांस्कृतिक कार्यक्रम व संगीत आरती होईल.
मंगळवारी (ता.११) सकाळी मंगल निनाद, आचार्य भक्ती, अभिषेक, शांतिधारा, आहारचर्या, दुपारी जिनवाणी पूजन व चातुर्मास उद्‍घोषण होईल. सायंकाळी दीक्षार्थींची मिरवणूक, सांस्कृतिक कार्यक्रम, मेहंदी, संगीत आरती होईल.
बुधवारी (ता.१२) मंगल निनाद, आचार्य भक्ती, अभिषेक, शांतिधारा, दीक्षार्थींचे मंगल स्नान, आहारचर्य झाल्यानंतर दीक्षा विधी होणार आहे. सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम, संगीत आरती होईल. प्रतिष्ठाचार्य म्हणून अजित भैया, तर संगीतकार म्हणून सचिन चौगुले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com