Thur, Feb 9, 2023

गांधीनगर मुख्य रस्त्यावर एकावर चाकूचे वार
गांधीनगर मुख्य रस्त्यावर एकावर चाकूचे वार
Published on : 9 January 2023, 6:50 am
गांधीनगरमध्ये एकावर चाकूने वार
गांधीनगर, ता. ९: ‘माझ्या मित्राचा मोबाईल का घेतलास, असा जाब विचारत चेतन पोवार (रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) याने चाकूचे वार करून वैभव पोपट माने (वय २१, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गांधीनगर) याला जखमी केले. हा प्रकार गांधीनगर मुख्य रस्त्यावर झाला. याबाबत चेतन पोवार याच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वैभव माने हा गांधीनगर मुख्य रस्त्यावरील एका दुकानात सेल्समन आहे. त्याला चेतन पोवार याने दुकानातून बाहेर बोलावून घेतले आणि माझा मित्र धीरज कांबळे याचा तू मोबाईल का घेतलास, असा त्याला जाब विचारला. तसेच मारण्याची धमकी देत शिवीगाळ केली. मी मोबाईल घेतला नाही, असे वैभव माने त्याला समजावून सांगत होता. तरीसुद्धा चेतन पोवार याने चाकूने वैभव मानेवर वार केले. त्यात तो जखमी झाला.