लिवाईस कंपनीच्या बनावट जीन्स विकणाऱ्या तीन दुकानांवर छापे. बेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लिवाईस कंपनीच्या बनावट जीन्स विकणाऱ्या तीन दुकानांवर छापे. बेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त
लिवाईस कंपनीच्या बनावट जीन्स विकणाऱ्या तीन दुकानांवर छापे. बेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त

लिवाईस कंपनीच्या बनावट जीन्स विकणाऱ्या तीन दुकानांवर छापे. बेचाळीस हजार रुपयांचा माल जप्त

sakal_logo
By

गांधीनगरमध्ये ४१ हजारांच्या
बनावट जिन्स जप्त

तीन दुकानांवर कारवाई

गांधीनगर, ता.२२ः गांधीनगर (ता. करवीर) येथील तीन दुकानांमध्ये लिवाईस कंपनीच्या बनावट जिन्स विक्री करत असताना छापा टाकून सुमारे ४१ हजार ५५० रुपयांच्या जिन्स जप्त करण्यात आल्या. येथील प्रसिध्द सिंधू मार्केटमधील दर्शन कलेक्शन, देवता कलेक्शन आणि रिया गारमेंट या दुकानांवर ही कारवाई केली. संजय अरविंद बचानी (वय ५८, रा. कांदिवली वेस्ट, मुंबई) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ही कारवाई करण्यात आली.
याबाबतची माहिती अशी की, येथील काही दुकानांमध्ये लिवाईस कंपनीच्या बनावट जिन्सची विक्री सुरू असल्याची माहिती कंपनी व्यवस्थापनाला मिळाली होती. त्यानुसार कंपनीचे प्रतिनिधी संजय बचानी हे गांधीनगर मार्केटमध्ये येऊन पाहणी करत असताना दर्शन कलेक्शन, देवता कलेक्शन आणि रिया गारमेंट या दुकानांमध्ये बनावट जिन्सची विक्री सुरु असल्याचे त्यांना आढळून आले. दुकानात छापा टाकल्यानंतर दर्शन कलेक्शनमधून १९ हजार ५०० रुपयांच्या जिन्स, देवता कलेक्शनमधून सुमारे १० हजार रुपयांच्या जिन्स आणि रिया गारमेंटमधून सुमारे १२ हजार रुपये किमतीच्या जिन्स जप्त केल्या. त्यानंतर या दुकानांचे मालक विकी साजनदास तलरेजा (वय ३९, रा. बॅरेक १६५/८, गांधीनगर), अविनाश विशणदास रोहिडा (वय ३१, रा. बॅरेक नं. १७०/११, गांधीनगर) आणि विष्णू मनोहरलाल डेबानी (वय ३१, रा. बॅरेक नं. ५०/७, गांधीनगर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला.