क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर  पोलीसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल
क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

क्रिप्टो करन्सीच्या माध्यमातून सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलीसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

sakal_logo
By

सहाजणांविरोधात गुन्हा दाखल
क्रिप्टो करन्सीतून ७० लाखांची फसवणूक प्रकरण

गांधीनगर, ता. १६ ः डॉक्सी कंपनीने आर्थिक गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून क्रिप्टो करन्सीतून ३५ गुंतवणूकदारांची सुमारे ७० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गांधीनगर पोलिस ठाण्यामध्ये सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेंद्र रणजितसिंह अंतील, राजेश ओमप्रकाश कपूर (दोघे रा. हरियाणा), स्वरूप गोवर्धन दत्ता (रा. परगना कलकत्ता), अलेक्झांडर डेंझील (रा. सरनोबतवाडी, कोल्हापूर), गुरमीत अजयसिंह (रा. शिवनगर, नवी दिल्ली), रुपेश लालजी राय (रा. साईनिष्ठ, नवी मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. याबाबत स्वप्नील सूर्यकांत पोरे (रा. सरनोबतवाडी, ता. करवीर) यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
सूर्यकांत पोरे यांचा कपडेविक्रीचा व्यवसाय आहे. वेबसाईटच्या माध्यमातून त्यांना डॉक्सी कंपनीची माहिती मिळाली. त्यानंतर नामांकित हॉटेलमध्ये कंपनीच्या प्रतिनिधींशी त्यांची चर्चा झाली. कंपनीने चांगल्या परताव्याचे आमिष पोरे यांना दाखविले. कंपनीच्या योजना पाहून पोरे यांनी चार लाख पंचवीस हजार रुपयांची गुंतवणूक केली. या गुंतवणुकीचे रूपांतर डॉलर या चलनामध्ये आणि त्यानंतर क्रिप्टोकरन्सीमध्ये करण्यात आले. सुरुवातीला काही दिवस कंपनी परतावा देत होती; परंतु अचानकपणे कंपनीने परतावा देणे बंद केल्यानंतर पोरे यांनी कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. यावेळी कंपनीच्या प्रतिनिधींनी कंपनी अधिक सक्षम करण्यासाठी परतावा बंद केल्याचे सांगितले; परंतु बरेच दिवस वाट पाहिल्यानंतरही परतावा न आल्यामुळे पोरे यांनी सहाजणांविरोधात गांधीनगर पोलिसांत गुन्हा दाखल केला.