हार्टफुलनेस ध्यान शिबिराचे वळिवडेत आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हार्टफुलनेस ध्यान शिबिराचे वळिवडेत आयोजन
हार्टफुलनेस ध्यान शिबिराचे वळिवडेत आयोजन

हार्टफुलनेस ध्यान शिबिराचे वळिवडेत आयोजन

sakal_logo
By

ध्यान शिबिर उद्यापासून
गांधीनगर: श्री रामचंद्र मिशनच्या वतीने हार्टफुलनेस ध्यान शिबिराचे आयोजन केल्याची माहिती अभिजित खांडेकर यांनी दिली. ३, ४, ५ मार्चला वळिवडे (ता. करवीर) येथील कुमार विद्या मंदिरच्या प्रांगणात दररोज सायंकाळी ६.३० ते ८.०० या वेळेत हे मोफत शिबिर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. हृदयावर आधारित वैज्ञानिक ध्यान पद्घती यावेळी घेतली जाणार आहे. आजच्या भौतिकवादी जगात मानसिक संतुलनासाठी ही ध्यानधारणा गरजेची आहे. १५ वर्षांवरील सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन खांडेकर यांनी केले. यावेळी सयाजी भोसले उपस्थित होते.