महागाईच्या निषेधार्थ उचगावला निदर्शने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महागाईच्या निषेधार्थ उचगावला निदर्शने
महागाईच्या निषेधार्थ उचगावला निदर्शने

महागाईच्या निषेधार्थ उचगावला निदर्शने

sakal_logo
By

02387
उचगाव (ता. करवीर) : येथे महागाईच्या निषेधार्थ आंदोलन झाले. या वेळी राजू यादव, सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच विराग करी, पोपट दांगट, अवधूत साळोखे आदी.

महागाईच्या निषेधार्थ उचगावला निदर्शने
गांधीनगर : बेरोजगारी आणि महागाईच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेतर्फे उचगाव (ता. करवीर) मुख्य प्रवेशद्वाराजवळ मोदी सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी महिलांनी रस्त्यावर चूल थाटून त्यावर भाकऱ्या थापत आणि गॅस सिलेंडरला हार घालून सरकारचा निषेध केला. करवीर तालुका प्रमुख राजू यादव, पोपट दांगट, विक्रम चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपसरपंच विराग करी, अवधूत साळोखे, विनोद खोत, राहुल गिरूले, संतोष चौगुले, कैलास जाधव, बाळासो नलवडे, अरविंद शिंदे, राहुल मोळे, आनंदा नाईक, विशाल सुर्यवंशी, योगेश लोहार, सचिन नागटिळक, दिपक फ्रेमवाला, दिपक अंकल, किशोर कामरा, अजित चव्हाण, अजित पाटील, बाबुराव पाटील, उत्तम अडसूळ, अनिल माळी, राम पाटील, शफीक देवळे, प्रभाकर सावंत, अजित शिर्के, अजित रोटे, शरद चव्हाण, मेनुद्दीन जलगार, संगीता आवळे, शोभा वासुदेव, शशिकला भोसले, सुभद्रा टोपकर, मनीषा गायकवाड, शमीमबानू बागवान उपस्थित होते.