गांधीनगर ग्रामपंचायतीवर कारवाई करा : शिवसेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांधीनगर ग्रामपंचायतीवर कारवाई करा : शिवसेना
गांधीनगर ग्रामपंचायतीवर कारवाई करा : शिवसेना

गांधीनगर ग्रामपंचायतीवर कारवाई करा : शिवसेना

sakal_logo
By

02396
ंगांधीनगर ग्रामपंचायतीत
मोकाट कुत्री, गाढवे सोडणार

ठाकरे गटाचा इशारा; बंदोबस्तासाठी निवेदन

गांधीनगर, ता. ८ : दहा वर्षांपासून मोकाट कुत्री आणि गाढवांचा बंदोबस्त न करणाऱ्या आणि ग्रामस्थांच्या जिवाशी खेळणाऱ्या गांधीनगर ग्रामपंचायतीवर ताबडतोब कारवाई करा; अन्यथा कार्यालयात कुत्री, गाढवे सोडून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा करवीर तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करवीर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तथा प्रशासक विजय यादव यांना बुधवारी देण्यात आला. कायमस्वरूपी ग्रामसेवक द्या, अशीही मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केली.
मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांनी गांधीनगरमध्ये धुडगूस घातल्याने २५ जण जखमी झाले. ग्रामपंचायतीला तक्रारी देऊनही कारवाई झाली नाही. दोन दिवसात पंचवीस जणांचा चावा पिसाळलेल्या कुत्र्यांनी घेतला. बांधकामाचे नियम व अटींचा भंग करून गांधीनगरमध्ये अतिक्रमणाचे जंगल उभा राहिले असून ग्रामपंचायत डोळेझाक करत आहे, हे स्पष्ट झाले आहे. सरपंच ट्रेनिंगला गेलेत, ग्रामसेवकाकडे दुसऱ्या गावचाही कारभार आहे, त्यामुळे ते उपस्थित नाहीत, अशा अवस्थेत ग्रामस्थांनी न्याय कुणाकडे मागायचा, असा जाबही तालुकाप्रमुख राजू यादव यांनी विचारला. कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने बेकायदा बांधकामासारख्या समस्या आहेत, अशीही कैफियत शिवसैनिकांनी मांडली.
प्रशासक विजय यादव यांनी निवेदन स्वीकारले. याबाबत ग्रामपंचायतीला नोटीस देण्यात येईल, असेही यादव यांनी शिवसैनिकांना सांगितले. यावेळी विक्रम चौगुले, उंचगावप्रमुख दीपक रेडेकर, बाळासाहेब नलवडे, विभागप्रमुख वीरेंद्र भोपळे, दीपक पोपटानी, दीपक अंकल, सुनील पारपाणी यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.