कोल्हापूर हुपरी-मार्गावर बसफेऱ्या  वाढवा

कोल्हापूर हुपरी-मार्गावर बसफेऱ्या वाढवा

‘कोल्हापूर-हुपरी मार्गावर
एसटी फेऱ्या वाढवाव्यात’

गांधीनगर, ता. २१: विद्यार्थी, शेतकरी, भाजीपाला विक्रेत्यासाठी कोल्हापूर-हुपरी मार्गावर राज्य परिवहन महामंडळाने बसफेऱ्या वाढवाव्यात, अन्यथा ‘रास्ता रोको’चा इशारा शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) करवीर शाखेतर्फे जिल्हा उपप्रमुख पोपट दांगट, अवधूत साळोखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कोल्हापूर विभागीय अधिकाऱ्यांना निवेदनातून दिला.
या मार्गावरील एसटीच्या फेऱ्या अपुऱ्या आहेत. बस वेळेत न येणे आणि न थांबणे, असे प्रकार होत असल्याने प्रवाशांना विशेषतः विद्यार्थिवर्गाला याचा त्रास सहन करावा लागत आहे. उचगाव, मणेरमळा, गडमुडशिंगी, व्यंकटेश पार्क, सूतगिरणी परिसर, चव्हाणवाडी, न्यू वाडदे आणि सांगवडे परिसरातील विद्यार्थ्यांसह प्रवाशांना आर्थिक फटका बसत आहे.
ग्रामीण जिल्हा समन्वयक दत्ता पाटील, करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, विनोद खोत, अपंग सेना तालुकाप्रमुख संदीप दळवी, तालुका उपप्रमुख राहुल गिरूले उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com