विद्यार्थी मोबाईल प्रश्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी मोबाईल प्रश्न
विद्यार्थी मोबाईल प्रश्न

विद्यार्थी मोबाईल प्रश्न

sakal_logo
By

हायस्कुलमध्ये
वाढली ट्रिंग ट्रिंग!
विद्यार्थ्यांचा मोबाईल सुटेना; अध्यायनात अडसर
दीपक कुपन्नावर : सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : दोन वर्षांपूर्वी कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षणाच्या रुपाने मोबाईल प्राथमिक, माध्यमिक प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या हातात आला. पण, आता शिक्षण ऑफलाईन होऊनही विद्यार्थ्यांना मोबाईल सुटेना झाला आहे. माध्यमिक शाळा आणि पालकांचे दुर्लक्ष याला कारणीभूत ठरू लागले आहे. शिक्षकांच्या मुभेमुळे मोबाईलची ट्रिंग ट्रिंग घुमू लागली आहे. विद्यार्थी चक्क रोजच वर्गात मोबाईल वापरू लागले आहेत. परिणामी, अध्यायनात अडसर निर्माण होऊन शालेय विद्यार्थी दशेतील शिस्तीलाच खोडा बसत आहे.
गेल्या ८-१० महिन्यांपासून शाळा नियमित भरू लागल्या. पण, दोन वर्षे मोबाईल फ्रेंडली बनलेल्या विद्यार्थ्यांना आता मोबाईल सुटवेना झाला आहे. मुख्यतः आठवी ते दहावीचे बहुतांश विद्यार्थी मोबाईल घेऊनच शाळेला येतात. शहरातील शाळात हे प्रमाण सर्वाधिक आहे.
वस्तुतः महाविद्यालयीन स्तरावर देखील विद्यार्थ्यांना वर्गात अथवा परिसरात मोबाईल वापरावर बंदी आहे. शैक्षणिक कामकाजात अडसर येऊ नये असाच उद्देश यामागे आहे. पण, माध्यमिक शाळांत याकडे दुर्लक्ष झाल्याचे विद्यार्थी वर्गात मोबाईल सर्रास वापरत आहेत. वर्गात शिक्षक पाठमोरे होताच मोबाईलचा गैरवापर सुरू होतो. खासकरून प्रशालेच्या आवारात समाजमाध्यमांचा वापर करण्यात विद्यार्थी गुंग असल्याचे चित्र आहे. याचा परिणाम, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीवर होतो आहे. मोबाईलमुळे शिस्तीलाही खोडा बसत आहे. त्यासाठी शिक्षक आणि शिक्षण संस्थानी कडक धोरण करावे, अशी मागणी आहे.
----------------
कोट..
मोबाईल वर्गात आणल्याने शालेय विद्यार्थ्यांची एकाग्रता कमी झाल्याचे आढळले. मोबाईलच्या घडामोडीकडेच लक्ष राहिल्याने अध्ययनाकडे दुर्लक्ष होते. अनेकदा मोबाईलचा दुरुपयोग केला जातो.
- महादेव पाडळकर, निवृत्त शिक्षक
------------
मुळातच मोबाईल वापरास पालकांचा मोठा विरोध आहे. पण, शाळेचा होमवर्क व्हॉटसॲप ग्रुपवर येतो असे सांगून मुले मोबाईल घेतात. त्यामुळे शाळांना याबाबत कडक निर्बंध घालायला हवेत.
- सुनील साठे, पालक, गडहिंग्लज