
भाविकांच्या सोयीसाठी नवी बसफेरी
भाविकांच्या सोयीसाठी नवी बसफेरी
गडहिंग्लज-गाणगापूर सेवा; आगारात अठरा गाड्या दाखल
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील आगारात नव्या अठरा बस दाखल झाल्या आहेत. भाविकांची मागणी लक्षात घेऊन गडहिंग्लज-गाणगापूर ही नवी बसफेरी सुरू केली आहे. श्री दत्त, अक्कलकोट आणि पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ही बसफेरी सोयीची होणार आहे. नव्या अद्ययावत गाड्यांमुळे भाविकांचा प्रवास आरामदायी होणार आहे. ठाणे, भोईसर परिसरात जाणाऱ्या प्रवाशांसाठीही नवी गाडी सुरू झाली आहे. पुढील आठवड्यात बीडला नवी गाडी सुरू होणार आहे.
सीमाभागातील गडहिंग्लज हे मोठे आगार आहे. कोल्हापूर, इचलकरंजीपाठोपाठ जिल्ह्यात एसटीच्या उत्पन्नात गडहिंग्लजचा क्रमांक लागतो. राज्यात उत्पन्न देणाऱ्या अधिक आगारांना नव्या गाड्या देण्यात आल्या. त्यांतील अठरा गाड्या या ठिकाणी आल्या आहेत. परिणामी, लांब पल्ल्याच्या ठिकाणी मागणी असणाऱ्या मार्गावर या गाड्या प्राधान्याने सोडण्यात आल्या असल्याची माहिती आगारप्रमुख संजय चव्हाण यांनी दिली. गडहिंग्लज-गाणगापूर ही बस सुरू करण्यात आली आहे. दत्त, अक्कलकोट आणि पंढरपूरला जाणाऱ्या भक्तांची या एकाच बसमुळे चांगली सोय होणार आहे.
पंढरपूरला आणखी एक जादा फेरी दुपारी सुरू करण्यात आली आहे. या अद्ययावत बसमध्ये बसण्यासाठी पुशबॅक सीटची सोय आहे. त्यामुळे भक्तांचा आरामदायी प्रवास होणार आहे. ठाणे परिसरात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी भोईसर ही गाडी संध्याकाळी सोडली आहे. बीडला पुढील आठवड्यात रोज सकाळी बस सोडण्यात येणार आहे. सध्या कोल्हापूर नॉन स्टॉपला सात गाड्या प्रत्येक अर्ध्या तासाला धावत आहेत. पुण्याला पाच गाड्या आहेत. संकेश्वरला प्रत्येक पंधरा मिनिटाला अशा सहा आणि गारगोटी आणि आजरा मार्गावर अर्ध्या तासाला प्रत्येकी तीन गाड्या धावत आहेत.
चौकट..
नव्या बसफेऱ्या
फेरी सुटणार परत
गाणगापूर सकाळी ८ वा. सकाळी ६.१५ वा.
भोईसर ठाणेमार्गे संध्याकाळी ७ वा. दु. ३.३० वा.
पंढरपूर दु. १ वा. सकाळी ६.३० वा.
-----------------------------